AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigo Flight Crisis : सॅनिटरी पॅड द्या, ब्लडिंग होतंय…विमानतळावर फुल्ल राडा, लेकीच्या पिरियडमुळे बापाचा आक्रोश!

Indigo Flight Crisis: सध्या सोशल मीडियावर इंडिगो फ्लाईट रद्द झाल्यामुळे चांगलाच गोंधळ सुरु आहे. अनेक प्रवासी कित्येक तास विमानतळावर बसून आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बाप मुलीसाठी सॅनिटरी पॅड शोधताना दिसत आहे.

Indigo Flight Crisis : सॅनिटरी पॅड द्या, ब्लडिंग होतंय...विमानतळावर फुल्ल राडा, लेकीच्या पिरियडमुळे बापाचा आक्रोश!
father-pleads-to-indigoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 06, 2025 | 3:58 PM
Share

देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारपर्यंत सलग चौथ्या दिवशी फ्लाइट्स उशिरा सुटणे आणि रद्द होणे (IndiGo Flights Cancelled) हा प्रकार सुरूच आहे. दरम्यान देशभरातील विमानतळावर इंडिगोच्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, एका विमानतळावरील व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या मुलीसाठी इंडिगोच्या ग्राउंड स्टाफकडे सॅनिटरी पॅड मागताना दिसत आहे. मुलीसाठी बापाची सुरु असलेली धावपळ पाहून अनेकांना वाईट वाटले आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती इंडिगोच्या कस्टमर सपोर्ट मॅनेजरकडे जाऊन वारंवार म्हणताना दिसतोय, “माझ्या मुलीला पॅड हवाय. खूप रक्त खाली येतय.” पण तरीही एअरलाइन स्टाफ काहीच प्रतिसाद देत नाही. मॅनेजरच्या या वागणुकीमुळे ती व्यक्ती मोठ्याने मदत मागू लागते. तेव्हा उत्तर येते, “सर, आम्ही असं करू शकत नाही.” मग काय, आधीच गर्दीने भरलेल्या काउंटरवर तणाव आणखी वाढल्याचे दिसत आहे. इतर प्रवाशांनीही एअरलाइनकडून मूलभूत मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली दिसते.

या गयगयाट करणाऱ्या वडिलांच्या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत की एवढ्या मोठ्या डिलेमध्ये एअरलाइन मूलभूत सुविधा का पुरवू शकली नाही? निराशा वाढतच आहे आणि उड्डाण व्यवस्था अजूनही अस्थिर आहे.

इंडिगोच्या अनेक फ्लाईट रद्द

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोची सर्व उड्डाणे शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. तर बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिवसभरात किमान १०२ उड्डाणे रद्द झाली. अनेक विमानतळांवर असाच गोंधळ सुरू आहे कारण परिचालनातील अडचणींमुळे एअरलाइनला वेळापत्रक राखता येत नाहीये. इंडिगोने नागरी उड्डयन महासंचालनालयाला (DGCA) कळवले आहे की पुढील दोन-तीन दिवस डिले आणि कॅन्सलेशन सुरू राहू शकतात. एअरलाइन ८ डिसेंबरपासून उड्डाणसंख्या कमी करण्याची योजना आखत आहे. इंडिगोला आशा आहे की त्यांची सेवा पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीपर्यंतच पूर्णपणे पूर्ववत होईल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.