AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Election Result: मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या जास्त? धाकधूक वाढली

देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल (Elections Result live) येत्या काही तासात हाती येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur Assembly) निकालांचीही उत्कंठा वाढत आहे.

Manipur Election Result: मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या जास्त? धाकधूक वाढली
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 9:45 AM
Share

मणिपूरः देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल (Elections Result live) येत्या काही तासात हाती येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur Assembly) निकालांचीही उत्कंठा वाढत आहे. पहिल्या तासाभरातील मतमोजणीचे निकाल पाहता येथे भाजपने (Bhartiya Janata Party) दणदणीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस काहीसा पिछाडीवर जातोय, असे दिसतंय. त्यापेक्षा अपक्ष उमेदवारांनीच 10 जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. मागील वेळी जास्त जागा असूनही काँग्रेसला येथे सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते.

मणिपूरमधील पहिल्या तासाभरातील चित्र काय?

– भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे – काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. – एनपीपी 11 जागांवर आघाडीवर आहे. – एनपीएफ- 4 जागांवर आघाडीवर आहे. – इतर अपक्ष उमेदवार 6 वर आघाडीवर आहेत.

2017 मध्ये काय स्थिती?

मणिपूरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता स्थापन केली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजपने सत्ता हस्तगत केले होती. 2017 च्या निवडणुकीत काँग्रसकडे 28 तर भाजपकडे 21 जागा होत्या. मात्र अपक्षांना हाती घेत भाजपने सत्तेचा दावा ठोकला होता. त्या निवडणुकीच एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदी पक्षांना सोबत घेत भाजपने आघाडी घेत सत्ता काबीज केली होती. तसेच 2017 मधील निवडणुकीत एनपीएफला 4, एनपीईपीला 4, टीएमसीला 1 एक तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.

इतर बातम्या-

Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे

Election Result 2022 Live: निकालाआधीच अखिलेश यांचे फटाके; म्हणतात, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का…

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.