अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर एन्काऊंटर, पहलगाममध्ये आत्तापर्यंत तीन दहशतवादी यमसदनी, 200 दहशतवादी पाकिस्तानातून घुसखोरीच्या तयारीत

पहलगामच्या श्रीचंद टॉपवर दहशवतादी लपून बसल्याची गुप्त माहिती सैन्यदलाला मिळाली होती. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अशरफ मौलवी असे आहे. अशरफ हा गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत सक्रीय होता. त्याने २०१३ साली हिजबुलची सदस्यता घेतली होती आणि त्यानंतर लगेचच तो वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट झाला होता. तो तेंगपावा कोपरनागचा रहिवासी होता.

अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर एन्काऊंटर, पहलगाममध्ये आत्तापर्यंत तीन दहशतवादी यमसदनी, 200 दहशतवादी पाकिस्तानातून घुसखोरीच्या तयारीत
pahalgam encounter
Image Credit source: ANI
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 06, 2022 | 10:32 PM

श्रीनगर – पाकिस्तानी सीमेवर असलेल्या नियंत्रण रेषेच्या पलिकडे 200 दहशतवादी (200 terrorist)जम्मूकाश्मीर (Jammu-Kashmir)मध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती, नॉर्दन आर्मीचे कमांडर लेफ्टनंट कर्नल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली आहे. या सीमारेषेजवळ पाकिस्तानचे ३५ दहशतवादी अड्डे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानी सैन्यतळांच्या जवळच हे दहशतवाद्यांचे कॅम्प असून यातील ६ मोठे तर २९ लहान स्वरुपाचे असल्याचेही द्विवेदी यांनी सांगितले आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर (Pakistan Army)आणि इतर यंत्रणांचे बळ मिळत असल्याचे यावरुन स्पष्ट होते आहे.  दरम्यान जम्मूकाश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सैन्यदलाने चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. पहलगामच्या श्रीचंद टॉपवर दहशवतादी लपून बसल्याची गुप्त माहिती सैन्यदलाला मिळाली होती. त्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अशरफ मौलवी असे आहे. अशरफ हा गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत सक्रीय होता. त्याने २०१३ साली हिजबुलची सदस्यता घेतली होती आणि त्यानंतर लगेचच तो वॉन्टेडच्या यादीत समाविष्ट झाला होता. तो तेंगपावा कोपरनागचा रहिवासी होता.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सैन्यदलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सैन्यदलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, त्यानंतर दोन्ही बाजूंत चकमक सुरु झाली. यात तीन दहशतवादी ठार झाले. हे तिघेही हिजबुलशी संबंधित होते, यातला एक जण दहशतवादी संघटनेत कमांडर होता, जो २०१६ पासून सक्रिय होता.

<

/p>

अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर झाली चकमक

ज्या वेळी जम्मूकाश्मीर अमरनाथ यात्रेच्या यजमानपदाची तयारी करत आहे, त्याचवेळी ही चकमक झाली. कोरोनामुळे गेली दोन वर्ष अमरनाथ यात्रा होऊ शकली नव्हती. यावर्षी पुन्हा एकदा अमरनाथ यात्रा उत्साहाने होणार आहे. यात्रा ३० जून ते ११ ऑगस्टपर्यंत असेल. यापूर्वीही अनेकदा अमरनाथ यात्रा ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. यावर्षीची यात्रा सुरक्षित वपार पडावी, यासाठी सैन्यदलाने या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, हालचालींवर त्यांची बारीक नजर आहे.

कोकरनागमध्ये एक दहशतवादी पकडला

या चकमकीपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमधून एका हिजबुल दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्याचे गाव नौगाम असून, मोहम्मद शेरगोजरी अशी त्याची ओळख पटली आहे. इश्फाक २०१७ पासून सक्रिय होता. तो अनेक दहशतवादी कारवायांत सामील होता. दुसरीकडे बडगाम पोलिसांनी दहशतवादी संघटना अंसार गजवत उल हिंदच्या २ दहशतवादी साथिदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून स्फोटके आणि २५ एके४७ रायफल्सही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरु आहे.

सांबा जिल्ह्यात बीएसएफने शोधले भुयार

गेल्या गुरुवारी सांबा जिल्ह्यात बीएसएफच्या अधिकाऱ्यांना एक भुयार दिसले. आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हे भुयार असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी पोस्ट असलेल्या चमन खुर्दपासून हे भुयार अवघ्या ९०० मीटर अंतरावर आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तपास केला असता, या भुयारात २१ वाळूची पोती मिळाली आहेत. हे भुयार नुकतेच खोदण्यात आल्याची माहिती आहे. २०१२ पासून आत्तापर्यंत पाकिस्तानी सीमेजवळ ११ भुयारे सापडली आहेत.

</p>

हे सुद्धा वाचा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें