राजस्थान-दिल्लीनंतर कर्नाटकमध्येही फटाकेबंदी, कोरोनाचं कारण सांगत मुख्यमंत्री येडियुरप्पांची घोषणा

प्रदूषण आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्नाटकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी (Firecrackers Ban in Karnataka) घालण्यात आली आहे.

राजस्थान-दिल्लीनंतर कर्नाटकमध्येही फटाकेबंदी, कोरोनाचं कारण सांगत मुख्यमंत्री येडियुरप्पांची घोषणा

बंगळुरु : प्रदूषण आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्नाटकमध्ये फटाके फोडण्यावर बंदी (Firecrackers Ban in Karnataka) घालण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या निर्णयाची घोषणा केली. याचा अधिकृत आदेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली (Firecrackers ban in Karnataka says CM B S Yediyurappa amid Covid19 pandemic).

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले, ‘कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन राज्यात फटाकेबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार कुणालाही फटाके फोडण्यास परवानगी नसेल. याचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल.’

दरम्यान, याआधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) दिल्ली सरकारने देखील फटाकेबंदीचा निर्णय जाहीर केला होता. दिल्लीत 7 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत फटाके फोडण्यास आणि फटाके विक्री करण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे.

दिल्लीच्या आधी राजस्थान सरकारने देखील असाच निर्णय घेतला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, “कोरोना साथीरोगाच्या काळात जनतेचं कोरोनापासून संरक्षण करणं यालाच पहिलं प्राधान्य आहे. त्यामुळेच राज्य सरकारने कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन फटाके विक्री आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीला नागरिकांनी फटाके फोडू नये.” राजस्थान सरकारने फटाके विक्रीचे परवाने देण्यावरही बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

दिवाळीला फटाके खरेदीसाठी मुंबईत गर्दी, तर दिल्लीत फटाकेबंदीने व्यावसायिक आक्रमक

नियम धाब्यावर बसवून फटाके फोडले, पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळली

Firecrackers ban in Karnataka says CM B S Yediyurappa amid Covid19 pandemic

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI