Drugs Case | फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीसह चार ड्रग्ज तस्करांची वैद्यकीय तपासणी सुरू, निर्मात्यालाही एनसीबीकडून समन्स!

एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती.

Drugs Case | फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीसह चार ड्रग्ज तस्करांची वैद्यकीय तपासणी सुरू, निर्मात्यालाही एनसीबीकडून समन्स!
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 11:35 AM

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी (Drugs Case) एनसीबीने अटक केलेले चार तस्कर आणि बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची (Firoz Nadiadwala) पत्नी शबाना सईद यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर रोजी एनसीबीने या 5 जणांना अटक केली होती. दरम्यान, याप्रकरणी निर्माते फिरोज नाडियाडवालाही एनसीबीने (NCB) समन्स बजावले आहेत (Firoz Nadiadwala’s wife and four drug peddlers being taken for their medical examination By NCB).

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) रविवारी (8 नोव्हेंबर) मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती.

बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले. बॉलिवूडशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले होते (Firoz Nadiadwala’s wife and four drug peddlers being taken for their medical examination By NCB).

बॉलिवूडमध्ये ड्रग्जची पाळेमुळे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली.

एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते.

(Firoz Nadiadwala’s wife and four drug peddlers being taken for their medical examination By NCB)

संबंधित बातम्या :

Drugs Case | ड्रग्स प्रकरणात NCB कडून अनेक ठिकाणी छापेमारी, पुन्हा बॉलिवूडमधील दिग्गजांचं अटकसत्र

Drugs Connection | ‘फरार’ करिश्मा एनसीबीसमोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात!

Kshitij Prasad | क्षितीज प्रसादवर कोकेन प्रकरणात नवा गुन्हा

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.