AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती

बंगळुरु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधींकडे केली आहे. जमीला नावाची संबंधित महिला म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. […]

VIDEO: सिद्धरामय्यांचं महिलेशी गैरवर्तन, माईक हिसकावताना पदर हाती
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

बंगळुरु: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा, तसंच जाहीर धमकावल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरानंतर भाजपने सिद्धरामय्या यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राहुल गांधींकडे केली आहे.

जमीला नावाची संबंधित महिला म्हैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार घेऊन गेली होती. जमीला या सिद्धरामय्यांच्या आमदार पुत्राची तक्रार करण्यासाठी आल्या होत्या. मात्र जमीला यांनी बोलण्यास सुरुवात करताच सिद्धरामय्या भडकले आणि त्यांनी महिलेच्या हातातून माईक काढून घेतला. माईक काढून घेताना महिलेच्या साडीचा पदरही खाली घसरला. तो त्या महिलेने तातडीने सावरला. मात्र जमीला आपल्या तक्रारीचा पाढा वाचताना, सिद्धरामय्यांनी तिच्या खांद्याला पकडून, ओरडून खाली बसवलं.

म्हैसूरमधील ही संपूर्ण घटना उपस्थित मीडिया कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. हा व्हिडीओ सार्वजनिक झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं.

भाजपकडून कारवाईची मागणी याप्रकारानंतर भाजपने काँग्रेस वरिष्ठांकडे सिद्धरामय्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपने या बहाण्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.

कोण आहेत सिद्धरामय्या सिद्धरामय्या हे काँग्रेसचे बडे नेते आहेत

सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

ते सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य आहेत.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!