Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये प्रणव मुखर्जी यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे.

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर
अनिश बेंद्रे

|

Aug 11, 2020 | 8:46 AM

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. (Former President Pranab Mukherjee on Ventilator)

प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी काल पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी काल केलं होतं.

85 वर्षीय प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. (Former President Pranab Mukherjee on Ventilator)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें