कराडमध्ये चार पायाची कोंबडी सापडली!

सातारा : चार पाय असलेली बॉयलर कोंबडी सध्या कराडमध्ये लोकप्रिय होत आहे. साताऱ्यातील कराड शहरात जुबेर पटवेकर हे जुबेर चिकन सेंटर चालवतात. त्यांच्याकडे चिकन कटिंगसाठी आलेल्या जिवंत बॉयलर कोंबडयांमध्ये ही चार पाय असलेली कोंबंडी आढळून आली. या चार पायाच्या कोंबडीला बघण्यासाठी लोक चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. कराड परिसरात ही चार पायाची कोंबडी कुतूहलाचा विषय ठरत […]

कराडमध्ये चार पायाची कोंबडी सापडली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

सातारा : चार पाय असलेली बॉयलर कोंबडी सध्या कराडमध्ये लोकप्रिय होत आहे. साताऱ्यातील कराड शहरात जुबेर पटवेकर हे जुबेर चिकन सेंटर चालवतात. त्यांच्याकडे चिकन कटिंगसाठी आलेल्या जिवंत बॉयलर कोंबडयांमध्ये ही चार पाय असलेली कोंबंडी आढळून आली. या चार पायाच्या कोंबडीला बघण्यासाठी लोक चिकन सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. कराड परिसरात ही चार पायाची कोंबडी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

या कोंबडीली बघण्यासाठी लोक दुकानात गर्दी करत असल्याने व्यवसायात वाढ झाली आहे. त्यामुळे जुबेर पटवेकर यांनी ही कोंबडी संभाळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गर्भ एकत्र येऊन जुळे तयार होता होता राहून गेल्याने हा प्रकार घडून आल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुबेर पटवेकर यांच्या दुकानात चिकन कटिंगसाठी आलेल्या जिवंत बॉयलर कोंबडयांमध्ये ही चार पाय आणि दोन गुदद्वार असलेली कोंबंडी आढळून आली. त्यांनी या कोंबडीला दुकानात ठेवले, ही बातमी कराडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे या कोंबडीला बघण्यासाठी लोकांची गर्दी जमायला लागली.

‘अनेक वर्षांपासून मी चिकन व्यवसायात आहे, पण ही अशा  प्रकारची कोंबडी मी प्रथमच बघितली. ग्राहकांकडून या कोंबडीची मागणी होत आहे, मात्र मी तिला संभाळणार आहे’ अशी प्रतिक्रिया जुबेर पटवेकर यांनी दिली.

जास्तीचे शारीरिक अवयव हा प्रकार मानवासह पशु-पक्षांमध्ये अतिशय दुर्मिळ आहे. लाखात एखादे अशाप्रकारचे उदाहरण बघायला मिळते. दोन गर्भ ऐकत्र येऊन जुळे तयार होता होता राहून गेलेला हा प्रकार असू शकतो किंवा कंझेनेटेड अबनॉर्मालिटी असू शकते. यात कुठलाही दैवी चमत्कार नाही, अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.