Friendship Day : ‘फ्रेंडशिप डे’ ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) साजरा केला जातो. मात्र या फ्रेंडशिप डे (Friendship Day) ची सुरुवात नेमकी कशी, कुठे आणि का झाली याची माहिती फार कमी लोकांना आहे.

Friendship Day : 'फ्रेंडशिप डे' ची जन्मकथा तुम्हाला माहित आहे का?

Friendship Day मुंबई : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात मैत्रीच्या नात्याची जागा फार खास असते. मैत्रीचं नातं हे जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानलं जातं. जर तुमच्या आयुष्यात मित्र नसेल, तर तुमचे आयुष्य व्यर्थ आहे असेही समजले जाते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day) साजरा केला जातो. मात्र या फ्रेंडशिप डे (Friendship Day) ची सुरुवात नेमकी कशी, कुठे आणि का झाली याची माहिती फार कमी लोकांना आहे.

भारतात दरवर्षी ऑगस्टच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. म्हणजेच भारतात आज फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने अनेक मित्र मैत्रिणी भेटतात, पार्टी करतात, पिकनिक प्लॅन करुन मैत्रीच्या दिवसाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन करतात. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डे चं महत्त्व फार वाढलं आहे.

भारतात फ्रेंडशिप डे चा ट्रेंड काही वर्षांपूर्वी सुरु झाला असला, तरी याचा इतिहास त्यामानाने फार जुना आहे. भारतात फ्रेंडशिप डे सुरु होण्यापूर्वी दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी मित्र मैत्रिणींना ग्रिटिंग कार्ड देत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय ‘फ्रेंडशिप डे’

जगभरात विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या मान्य करण्यात आला.

पण भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर अमेरिकेतील ओहायोमधील ओर्बलिनमध्ये 8 एप्रिलला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे च्या काही रंजक गोष्टी

फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही जगातील सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे. असं म्हटलं जाते की, पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. ही भावना संपवण्यासाठी 1935 मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल असे ठरवण्यात आले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असते. त्यामुळे लोक एकत्रित येऊन हा दिवस साजरा करु शकतात.

तर दुसरीकडे असे म्हटले जाते की, 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्या आठवणीत आत्महत्या केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला. त्या निर्दोष व्यक्तीचा जीन घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल 21 वर्षांनी 1958 मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला.

त्याशिवाय 1930 मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे ची सुरुवात केली. जोएस हाल असे या व्यापाराचे नाव आहे. जगभरातील सर्व लोकांप्रमाणे मित्रांसाठीही एक खास दिवस असावा या कारणाने या व्यापाराने फ्रेंडशिप डेची सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यापाऱ्याने 2 ऑगस्ट  हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून निवडला. त्यानंतर युरोप आणि आशिया यासारख्या बहुतांश देशात या परंपरेला पुढे नेत फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

तसेच दक्षिण अमेरिकेतील पेराग्वेमधील डॉक्टर रमन आर्टिमियो यांनी 20 जुलै 1958 रोजी एका डिनर पार्टीदरम्यान मित्रांसाठी खास दिवस असावा अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे ची सुरुवात झाली. तसेच ही परंपरा कायम रहावी याचीही काळजी घेण्यात आली.

पाश्चिमात्य देशांमध्येच ‘फ्रेंडशिप डे’ चा पायंडा

दरम्यान फ्रेंडशिपचा इतिहास पाहता व्हॅलेटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे या सारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डे चा पायांडा पाश्चिमात्य देशांमध्ये रुजवण्यात आला. ग्रिटिंग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचं वचन घेतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI