पुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरता येणार, इतर कागदपत्रांची सक्ती नाही

पुण्यात 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, गुणपत्रिकेद्वारे फॉर्म भरता येणार, इतर कागदपत्रांची सक्ती नाही

पुण्यात आजपासून (1 ऑगस्ट) 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली (FYJC Online Admission) आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Aug 01, 2020 | 10:28 AM

पुणे : पुण्यात आजपासून (1 ऑगस्ट) 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली (FYJC Online Admission) आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड यासह इतर मनपा क्षेत्रात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे यावेळी गुणपित्रकेद्वारे फॉर्म भरता येणार आहे. इतर कागदपत्रांची सक्ती नाही. प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरता येणार आहे (FYJC Online Admission).

शुल्क भरून फॉर्म ब्लॉक करणे आवश्यक आहे. तसेच अर्जातील माहीती शाळा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेणे. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहीती भाग-1 ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरिफाईड करून घ्यावा.

यावेळी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेद्वारे 11 वीचा प्रवेश अर्ज भरता येणार आहे. इतर कागदपत्रांची अर्ज भरण्यासाठी सक्ती नाही. कोरोनामुळे इतर कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची अडकवून होणार नाही. अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी ही माहिती दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कागदपत्रांऐवजी प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ही सूट देण्यात आली आहे. 11 वीचा प्रवेश अर्ज केवळ गुणपत्रिकेद्वारे भरता येईल. पण ज्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असतील तर ते अपलोड करु शकतील.

क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, बदली आदेश आदी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांनी अर्ज भरतेवेळी अपलोड करणे आवश्यक आहे.

11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणांमुळे सादर न केल्यास त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ दिली जाणार आहे.

11 वी प्रवेशाची क्षमता

महाविद्यालय -304

कला शाखा -15581

वाणिज्य – 42,755

विज्ञान -43,981

एमसीव्हीसी – 4495

संबंधित बातम्या : 

SSC Result 2020 | मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी

SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें