कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना

कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये आज (22 ऑगस्ट) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली (Ganeshotsav in Kolhapur Corona Center).

कोल्हापुरात कोरोना सेंटरमध्ये गणरायाचे आगमन, मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते प्रतिष्ठापना
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 6:38 PM

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कागल येथील कोविड सेंटरमध्ये आज (22 ऑगस्ट) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली (Ganeshotsav in Kolhapur Corona Center). गणपतीची प्रतिष्ठापना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यात नवीन शंभर बेडचे नवे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटनही हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले (Ganeshotsav in Kolhapur Corona Center).

“कोविड केअर सेंटरमध्ये गणपती प्रतिष्ठापना हे राज्यातील पहिलेच उदाहरण असावे असा दावा यावेळी मुश्रीफ यांनी केला. त्यासोबतच विघ्नहर्त्याकडे त्यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर कर”, अशी प्रार्थनाही केली.

राज्यात आज अनेकांच्या घरी उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये त्यामुळे यंदा अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यासोबत गणेशाचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांकडूनही स्वागतार्ह पाऊल उचलले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत गणेश मंडळांनी खबरदारी म्हणून गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबादमध्ये तब्बल 577 गणेश मंडळांनी तर वसईमध्ये 181 गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विभागातील 7 पोलीस ठाणे, 3 डीवायएसपी (DYSP) कार्यालय आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील यंदाचा गणेशोत्सव रद्द करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील गणेशोत्सव रद्द करुन 1 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Ganesh Chaturthi 2020 | दर्शनासाठी घरोघरी जाणे टाळा, सामूहिक आरतीही नको, कोकणातील गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जारी

Pune Ganeshotsav | अनेक मंडळांचे बाप्पा मंदिरातच, तर मानाचे पाच गणपती मंडपात विराजमान होणार

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.