लग्नाला नकार देणाऱ्या तरुणावर तरुणीचा अॅसिड हल्ला

लग्नाला नकार देणाऱ्या तरुणावर तरुणीचा अॅसिड हल्ला
प्रातिनिधिक फोटो

प्रेम प्रकरणातून एका मुलीने आपल्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सचिन पाटील

| Edited By:

Jun 17, 2019 | 2:33 PM

नवी दिल्ली : प्रेम प्रकरणातून एका मुलीने आपल्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना 11 जून रोजी दिल्लीच्या विकासपुरी येथे घडली. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली मुलीला पोलिसांनी रविवारी (16 जून) अटक केली आहे.

आतापर्यंत तुम्ही पाहिले असेल अनेकदा मुलींवर अॅसिड हल्ले झालेले आहेत. मात्र पहिल्यांदाच मुलावर अॅसिड हल्ला झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालेली दिसत आहे. मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रमेसंबध होते. मात्र लग्नाचा विषय काढताच मुलाने लग्नासाठी नकार दिला. प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याने मुलीने प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याचा कट रचला. मुलीने बॅगेतून अॅसिड आणले आणि बाईकवर मुलाच्या मागे बसली असताना तिने मुलाच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात मुलगीही जखमी झाली आहे.

हा हल्ला झाल्यानंतर दोघंही जखमी झाल्यामुळे कुणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. पण मुलाला जेव्हा समजले की त्याचा एक डोळा 70 टक्के खराब होण्याची शक्यता आहे. यानंतर मुलाने पोलिसांत तक्रार केली.

“सुरुवातीला चौकशी दरम्यान, असं वाटत होते की मुलीवर अॅसिड अज्ञात व्यक्तीने फेकलं आहे. मात्र मुलीवर संशय आल्याने तिची चौकशी केली असता अॅसिड हल्ला तिने केला असल्याची कबुली दिली”, असं पोलीस म्हणाले.

“घरात साफसफाई करताना वापरले जाणारे अॅसिड मी मुलाच्या चेहऱ्यावर फेकले. कारण मला त्याच्यासोबत लग्न करायचे होते, पण तो माझ्यासोबत ब्रेकअप करत होता. आमचे दोन-तीन वर्ष प्रेमसंबध होते”, असं आरोपी मुलगी म्हणाली

“हल्ला होण्याआधी मुलीने मुलाला हेल्मेट काढायला सांगितले होते. तिला मुलाचा चेहरा इतका खराब करायचा होता की, त्याला लग्न करण्यास मजबूर करायचे होते. आरोपी मुलीने अॅसिड हल्ला करण्याआधी स्वत: च्या हातावर अॅसिड टाकून पाहिले होते आणि यानंतर तिने मुलावर हल्ला केला”, असं पोलिसांनी सांगितले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें