देशातील रोजगारीचा दर घटला; बेरोजगारीचा दर घटून 7.6 वर आला; कर्नाटक, गुजरातमध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी

मुंबईः देशाची अर्थव्यवस्था (Economy)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, आणि त्या बरोबरच देशातील बेरोजगारीची टक्केवारीही आता घटत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सीएमआयईच्या मतानुसार फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ही 8.10 होती, तर मार्च महिन्यात हिच आकडेवारी घटल्याने 7.6 टक्के झाली आहे. 2 एप्रिल […]

देशातील रोजगारीचा दर घटला; बेरोजगारीचा दर घटून 7.6 वर आला; कर्नाटक, गुजरातमध्ये सगळ्यात कमी बेरोजगारी
भारतातील बेरोजगारीच्या दरात घसरण
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 8:53 PM

मुंबईः देशाची अर्थव्यवस्था (Economy)आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, आणि त्या बरोबरच देशातील बेरोजगारीची टक्केवारीही आता घटत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. सीएमआयईच्या मतानुसार फेब्रुवारी महिन्यात देशातील बेरोजगारीची (Unemployment) टक्केवारी ही 8.10 होती, तर मार्च महिन्यात हिच आकडेवारी घटल्याने 7.6 टक्के झाली आहे. 2 एप्रिल रोजी ही टक्केवारी घटल्याने 7.5 टक्केवारीवर आली आहे. शहर परिसरातील बेरोजगारीची टक्केवारी ही 8.5 टक्के तर ग्रामीण भागातील बेरोजगारीची टक्केवारी ही 7.1 टक्के झाली आहे. भारतातील सांख्यिकीय विभागातील एका माजी अधिकारी आणि सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सांगितले की, बेरोजगारीचा दर सध्या घटत आहे. मात्र भारतासारख्या गरीब देशाच्या दृष्टीने ही टक्केवारी तशी कमीच आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर

देशातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते, बेरोजगारीचाही दर कमी होत आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) यांच्याकडून ही आकडेवारी सांगण्यात आली आहे. त्यांच्या मतानुसार बेरोजगारीचा दर फेब्रुवारी महिन्यात 8.10 टक्के होता तर मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर घटून 7.6 झाला आहे.

ग्रामीण भारतात परिस्थिती गंभीर

हरियाणा सरकारने सांगितले की, भारतासारख्या गरीब देशातील ही बेरोजगारीची टक्केवारी कमी झाली असली तरी, त्या भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. तर ग्रामीण भागातील तरुण ही बेरोजगारी सहन करु शकणार नाहीत. त्यामुळेच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचे खाण्यापिण्याचे प्रश्न मिठला की तो कोणतेही काम करण्यास तयार होत आहे.

सर्वाधिक आकडेवारी हरियाणात

बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात बेरोजगारीची आकडेवारी हरियाणामध्ये 26.7 टक्के होती. तर त्यानंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये 25-25 टक्के होती. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर हा 14.4, त्रिपुरामध्ये 14.1 पश्चिम बंगाल 5.6 टक्के राहिला आहे. तर एप्रिल 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 7.97 टक्के होता. मागील वर्षी मे महिन्यात हा दर 11.84 टक्क्यांवर पोहचला होता. तर मार्च 2022 मध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा हा दर 1.8-1.8 टक्के एवढाच होता.

संबंधित बातम्या

Ajit Pawar : सरळ देत नसतील तर बोट वाकडं करावं लागतं, टनामागे 10 रुपये देण्यावरून अजित पवारांचा कारखान्यांना इशारा

इंदिरा गांधींच्या 75 किलोच्या चांदीचा वारसदार कोण?; सध्या या चांदीची किंमत आहे ‘एवढी’

Raj Thackeray Speech : बेरोजगारी-महागाई विसरून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली? यशोमती ठाकूर यांचा खोचक सवाल