इंदिरा गांधींच्या 75 किलोच्या चांदीचा वारसदार कोण?; सध्या या चांदीची किंमत आहे ‘एवढी’

मुंबईः बिजनोर जिल्हा कोषागार (Treasuries) विभाग गेल्या 50 वर्षांपासून माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ठेवलेली 73 किलो चांदी ठेव म्हणून ठेवलेली अमानत सांभाळून ठेवण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षापासून ही चांदी (Sliver) कोषागारमध्ये ठेवण्यात आली असली तरी आजपर्यंत ही चांदी परत घेण्यासाठी इंदिरा गांधी कुटुंबीयांच्यापतीने कोणताही दावा करण्यात आलेला नाही. आजच्या दरानुसार […]

इंदिरा गांधींच्या 75 किलोच्या चांदीचा वारसदार कोण?; सध्या या चांदीची किंमत आहे 'एवढी'
इंदिरा गांधींना दिलेले सोने त्यांनी बिकनोरच्या कोषागारमध्ये ठेवले होते, त्याला आता 50 वर्षे झालीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 8:04 PM

मुंबईः बिजनोर जिल्हा कोषागार (Treasuries) विभाग गेल्या 50 वर्षांपासून माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ठेवलेली 73 किलो चांदी ठेव म्हणून ठेवलेली अमानत सांभाळून ठेवण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षापासून ही चांदी (Sliver) कोषागारमध्ये ठेवण्यात आली असली तरी आजपर्यंत ही चांदी परत घेण्यासाठी इंदिरा गांधी कुटुंबीयांच्यापतीने कोणताही दावा करण्यात आलेला नाही. आजच्या दरानुसार चांदीची किंमत सुमारे 33 ते 34 लाख रुपये आहे. कोषागार अधिकाऱ्यांमार्फत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या या मालकीच्या चांदीला भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सोपवण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला, त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने कोषागार विभागाला ही चांदी ताब्यात घेण्यास देत स्पष्टीकरण देण्यात आले की, ही संपत्ती त्यांच्या मालकीची आहे, त्यामुळे आम्ही ती घेऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

त्यानंतर राज्य सरकारलाही याबाबत कल्पना देऊन त्यांचे मत मागविण्यात आले मात्र राज्य सरकारकडूनही कोणतेही त्यानंतर स्पष्टीकरणे देण्यात आले नाही. त्यामुळे आजही इंदिरी गांधी यांच्या मालकीचे 75 किलो चांदी बिजनोर कोषागारकडेच ठेवण्यात आले आहे.

इंदिरा गांधी आणि चांदी तुलाभार

आशिया खंडातील सगळयात मोठा मातीचा बांध बिजनोरमधील कालागडमध्ये बांधण्यात येणार होता. या मातीच्या बांधकामाचे काम सुरु असताना, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आभार मानण्यासाठी म्हणून बिजनोरमधील नागरिकांनी 1972 मध्ये त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्या सभेत कालागडमध्ये मातीचा बांध बांधणारे मजूर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी इंदिरा गांधी यांची तुलाभार करण्यात आली होती, इंदिरा गांधींची तुलाभार करताना एका तराजूत चांदी टाकण्यात आली होती, तर एका बाजूला इंदिरा गांधी होत्या. त्यावेळी त्यांचे वजन 72 किलोच्या आसपास होते. त्या चांदीबरोबरच इतर वस्तुंचाही समावेश त्यामध्ये होता.

चांदीसाठी अनेक पत्रव्यवहार

बिजनोरमध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलाभार झाल्यानंतर त्यांनी ती चांदी आपल्याबरोबर घेऊन गेल्या नाहीत. तर त्यावेळच्या तत्कालिन प्रशासनाने ती सगळी चांदी बिजनोर जिल्ह्यातील कोषागारमध्ये ठेवली. तेव्हापासून ते आजपर्यंत इंदिरा गांधी यांची ही अमानत कोषागार विभागाने जपून ठेवली आहे. त्यानंतर कोषागार विभागातील अधिकाऱ्यांनी ती चांदी पुन्हा ताब्यात देण्यासाठी पत्रव्यवहार केले मात्र प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

संपत्तीचे दरवर्षी नूतनीकरण

बिजनोर जिल्हा कोषागार अधिकारी सूरज कुमार सिंग यांनी सांगितले की, ही चांदी परत दिली जाऊ शकते त्यासाठी फक्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कुटुंबीयांतील कोणत्याही सदस्यांनी या चांदीवर आपला हक्क सांगितला पाहिजे. कोषागारच्या नियमानुसार कोणतीही वैयक्तीक संपत्ती ही 1 वर्षापेक्षा अधिक काळ कोषागारमध्ये ठेऊ शकत नाही, मात्र इंदिरा गांधी यांची ही संपत्ती गेल्या 50 वर्षांपासून कोषागारमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या संपत्तीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे आता आम्ही सांगू शकत नाही की, ही चांदी गांधी परिवार आपल्या ताब्यात घेणार की, आणखी पुढील काही वर्षे ही चांदी कोषागारमध्येच ठेवणार.

संबंधित बातम्या

Sujat Ambedkar : आम्हाला ”बी टीम” म्हणणाऱ्यांची विश्वसाहार्ता धोक्यात, पाहटेच्या शपथविधीवरून सुजात आंबेडकरांनी डिवचलं

राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतात : अजित पवार

देवेंद्रभाऊ,तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर मविआ सरकार अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.