भाजपला धक्क्यावर धक्के, NDA मधून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

शिवसेना आणि अकाली दलाने एनडीएला रामराम ठोकल्यानंतर पश्चिम बंगालमधील गोरखा मुक्ती मोर्चाने देखील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

भाजपला धक्क्यावर धक्के, NDA मधून आणखी एक मित्रपक्ष बाहेर
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 10:39 PM

नवी दिल्ली :  भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. शिवसेना आणि अकाली दलाने एनडीएला रामराम ठोकल्यानंतर पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने (Gorkha janmukti Morcha) देखील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. (Gorkha janmukti Morcha Going to be out Of NDA)

गोरखा मुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग यांनी आपण एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) गोरखा जनमुक्ती मोर्चा बाहेर पडल्याने गेल्या काही काळातला एनडीएसाठी हा तिसरा धक्का आहे.

“भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. आम्ही त्यांच्यासोबत अनेक दिवस होतो. मात्र आम्हाला दिलेल्या आश्वासनांच्या दिशेने त्यांची पावले पडली नाही.  दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जींनी आम्हाला दिलेली आश्वासने पाळली, आम्हाला दिलेले शब्द पाळले. म्हणून  2021 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगालच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही तृणमुल काँग्रेसशी युती करुन लढणार आहोत”, असं बिमल गुरुंग यांनी जाहीर केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गोरख्यांना काही महत्त्वाची आश्वासने दिली होती. मात्र ती पूर्ण करण्यात त्यांना अपयश आलं आहे. त्यांनी आमच्या आश्वसनांची पूर्तता न केल्याने आम्ही एनडीएमधून बाहेर पडत आहोत”, असं गुरुंग म्हणाले.

थोड्या दिवसांपूर्वी अकाली दलाची एनडीएमधून एक्झिट 

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने मोठा निर्णय घेतला. अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. याआधी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अकाली दलाने थेट आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना-भाजपचा 28 वर्षांचा संसार मोडला

गेली 28 वर्ष शिवसेना भाजप एकत्र नांदत होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाली. याचं रुपांतर युती तुटण्यात झालं. अखेर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सेनेने आपण एनडीमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं.

एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम

तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी झटणारे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा गुडबाय केलं आहे. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा फटका बसणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

(Gorkha janmukti Morcha Going to be out Of NDA)

संबंधित बातम्या

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

वाढदिवशी पंतप्रधान मोदींना मोठा झटका, शेतकरी विधेयकाविरोधात महिला मंत्र्याचा राजीनामा

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.