Mumbai : कांदिवली शिक्षण संस्थेच्या बी के श्रॉफ महाविद्यालयाला क्यू.एस.आय. गेज संस्थेचे सुवर्ण मानांकन प्रमाणपत्र ! राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 

स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढवणं सुलभ होतं. यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले राष्ट्रीय मानांकन सुधरवावे, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केलं.

Mumbai : कांदिवली शिक्षण संस्थेच्या बी के श्रॉफ महाविद्यालयाला क्यू.एस.आय. गेज संस्थेचे सुवर्ण मानांकन प्रमाणपत्र ! राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान 
कांदिवली शिक्षण संस्थेच्या बी के श्रॉफ महाविद्यालयाला क्यू.एस.आय. गेज संस्थेचे सुवर्ण मानांकन प्रमाणपत्र ! Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:15 PM

मुंबई : कांदिवली (Kandivali) शिक्षण संस्थेच्या बी के श्रॉफ कला व एम एच श्रॉफ वाणिज्य महाविद्यालयाला काल (11 एप्रिल) राज्यपाल (Governor) कोश्यारी यांच्या हस्ते क्यू.एस.आय. गेज संस्थेचे सुवर्ण मानांकन प्रमाणपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात आलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन स्वायत्ततेचा (Autonomous) पुरस्कार करणारं आहे. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढवणं सुलभ होतं. यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले राष्ट्रीय मानांकन सुधरवावे, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केलं. विद्यार्थ्यांनी उत्तम इंग्रजी भाषा अवश्य शिकावी परंतु माता, मातृभाषा व मातृभूमीला विसरू नये असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालय व विद्यापीठांचे गुणांकन करणारी खासगी गुणांकन संस्था

कार्यक्रमाला आमदार योगेश सागर, संस्थेचे अध्यक्ष सतिश दत्तानी, उपाध्यक्ष महेश शाह, क्यू.एस.आय. गेज रँकिंग संस्थेचे विभागीय संचालक अश्विन फर्नांडिस, महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्या डॉ लिली भूषण, शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. क्यू.एस.आय. गेज ही शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांचे गुणांकन करणारी खासगी गुणांकन संस्था आहे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

 …तर त्यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती व भाषेचा स्वाभिमान वाढेल

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवीनता, इन्क्युबेशन यासोबतच प्रादेशिक भाषांमधील शिक्षणाला महत्त्व दिलं गेलंय. राज्यातील महाविद्यालयांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं तर त्यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती व भाषेचा स्वाभिमान वाढेल व राष्ट्रीय एकात्मता देखील वृद्धिंगत होण्यास मदत होईल असं राज्यपालांनी सांगितले.

त्याचबरोबर श्रॉफ महाविद्यालयाने आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असं देखील राज्यपाल म्हणालेत.

इतर बातम्या :

Umran Malik SRH: ‘तो’ लवकरच भारतासाठी खेळेल, मायकल वॉनची भविष्यवाणी

VIDEO : Pravin Darekar यांचा जामीन मंजूर, कोर्टात नक्की काय झालं?

पाच ते सात लाखाच्या बजेटमध्ये कार घ्यायचीय? ‘हे’ आहेत 5 कॉम्पॅक्ट SUV पर्याय

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.