AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Bogus recruitment case|पुणे जिल्हा परिषदेतही बोगस भरती प्रकरणाचं वादळ, 14 ग्रामसेवकांसह 2 कृषी अधिकाऱ्यांना घरचा रस्ता, नेमकं घोटाळा काय?

या बोगस भरती प्रकरणी आज तब्बल 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच सहा ग्रामसेवकांवर दोषारोपपात्र दाखल करण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. 22 अधिकाऱ्यांच्या चौकशीची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.

Gram Panchayat Bogus recruitment case|पुणे जिल्हा परिषदेतही बोगस भरती प्रकरणाचं वादळ, 14 ग्रामसेवकांसह 2 कृषी अधिकाऱ्यांना घरचा रस्ता, नेमकं घोटाळा काय?
pune zp
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 3:52 PM
Share

पुणे : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal corporation)   नुकताच 23 गावांचा सामेवश झाला. महापालिकेत समावेश होता असतानाचा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नियमबाह्य बोगस भरती ( Gram Panchayat Bogus recruitment case) झाल्याचे समोर आले होते. या बोगस भरती प्रकरणी आज तब्बल 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच सहा ग्रामसेवकांवर दोषारोपपात्र दाखल करण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. 22 अधिकाऱ्यांच्या चौकशीची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही कारवाई केली आहे. बोगस भरती प्रकरणी 22 ग्रामपंचायतीमधील माजीसरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अश्या 212 जणांना जिल्हा परिषदेने(zila parishad) नोटिसा बजावल्या होत्या या भरतीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पैकी 658 जणांची नियमबाह्य नेमणूक केल्याचे चौकशी समितीच्या लक्षात आले.

यांच्यावरही झाली कारवाई

बोगस भरती प्रकरणी 16 अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायतीतील 69 कर्मचारी त्यांच्या मंजूर आकृतीबंधावर होते, यापूर्वी 247 जणांची भरती करण्यात आली होती आणि ते बऱ्याच दिवसांपासून काम करत होते. परंतु, या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आली. हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीत मांजरी ग्रामपंचायतींमध्ये 44 जणांची भरती झाल्याचे निष्पन्न झाले होते

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता गोंधळ

या बोगसभारतीवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हापरिषद सदस्यांनी या बोगस भरतीमुळे जिल्हा परिषदेचे नाव खराब झाले आहे. यातील दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत जिल्हापरिषद सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. याबरोबरच यामध्ये अनेक तरुणांची नोकरी लावण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक झाल्याचेही समोर आले होते. जिल्हा परिषदेने महापालिकेला पाठविलेल्या दस्तांमध्ये ९२६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, दस्त पालिकेत समाविष्ट होताच भरतीचा आडका १ हजार १२८ पर्यंत पोहचला होता.

पोटात पाप म्हणूनच म्हणूनच मैं जेल में जाऊंगाचा आरडाओरडा, सोमय्यांचे मलिकांवर शरसंधान; चोरीचा माल वापस किया म्हणत राऊतांवर टीका

Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 20 December 2021

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.