जीएसटी करात मोठे बदल, डाळ, तेल, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

केंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता (GST Slab Increase) आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.

जीएसटी करात मोठे बदल, डाळ, तेल, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच आता जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल करणार असल्याची शक्यता (GST Slab Increase) आहे. केंद्राला मिळणाऱ्या महसूलामध्ये घट झाल्यामुळे जीएसटी परिषदेत गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर वाढवण्यात येणार (GST Slab Increase) आहे. जीएसटी दर 5 टक्क्यांवरुन वाढवून तो 10 टक्क्यांपर्यंत केला जाणार आहे. या बदलामुळे सरकारला एक हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तर सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता (GST Slab Increase) आहे.

जीएसटी स्लॅबमध्ये चार स्लॅब आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर 5, 12, 18 आणि 28 टक्के स्लॅबचा समावेश आहे. पाच टक्के जीएसटी हा गरजेच्या वस्तू अन्न, हॉटेल, कपडे यावर लावला जातो.

प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार 1.18 कोटी रुपयांचे महसूल जीएसटीच्या माध्यमातून कमवते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जीएसटी परिषदेच्या अध्यक्षा आहेत.  दरम्यान याच पार्श्वभूमीवर जीएसटी पॅनलमध्ये समावेश असलेले तसेच इतर राज्याचे अर्थमंत्री येणाऱ्या 15 डिसेंबर रोजी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत जीएसटीमध्ये होणाऱ्या कमाईत वाढ करण्यासाठी जीएसटी स्लॅबच्या करात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ (GST Slab Increase) शकतो.

पुढच्या वर्षी कार, तंबाकू आणि कोळसा उत्पादन महाग होऊ शकतात. जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जीएसटीचे दर वाढल्यानंतर वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.

Published On - 6:28 pm, Sat, 7 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI