32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

गुजराती फिल्म संगीतकार आणि गायक महेश कनोडिया यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं आहे. (Gujarati film composer singer Mahesh Kanodia passed away).

32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : गुजराती फिल्म संगीतकार आणि गायक महेश कनोडिया यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे (Gujarati film composer singer Mahesh Kanodia passed away).

“महेश कनोडिया यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं. ते एक बहुमुखी प्रतिभासंपन्न गायक होते. त्यांच्यावर लोकांनी भरपूर प्रेम केलं. एक राजकीय नेता म्हणून देखील गरीब आणि मागास लोकांना सशक्त करण्याचं काम त्यांनी केलं. हितु कनोडिया यांच्याशी मी बात करुन त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त केली”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

महेश कनोडिया भाजपचे सदस्य होते. त्यांनी पाटन मतदारसंघाचं अनेक वेळा लोकप्रतिनिधीत्व केलं आहे. कनोडिया हे लोकप्रिय गायक होते. ते 32 गायकांच्या आवाजात गायचे. विशेष म्हणजे यात महिला गायकांचादेखील समावेश होता. त्यामुळे लोकांनी त्यांच्या आवाजावर आणि त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं (Gujarati film composer singer Mahesh Kanodia passed away).

गुजराती सिनेकलाकारांकडून दु:ख व्यक्त

कनोडिया यांच्या निधनानंतर गुजराती सिनेकलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “संपूर्ण गुजराती सिनेमासाठी ही वाईट बातमी आहे. आमचा खरा रत्न आता नाही राहिला. दु:ख शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही”, असं हितेन कुमार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI