…तोपर्यंत टीव्हीवाले आपल्याकडे बघत नाहीत हे दरेकांना चांगलं माहीत : गुलाबराव पाटील

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही.

...तोपर्यंत टीव्हीवाले आपल्याकडे बघत नाहीत हे दरेकांना चांगलं माहीत : गुलाबराव पाटील

जळगाव : राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले की, विरोधीपक्ष नेता आरोप करत नाही तोवर टीव्हीवाले त्यांना बघत नाहीत, हे दरेकरांना चांगलंच माहीत आहे. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. (Gulabrao Patil slams Pravin Darekar over Farmers loan waiver)

आज (शनिवारी) जळगाव जिल्ह्यातील शिरसोली प्र. बो. ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गेले होते. तिथे त्यांनी विरोधीपक्ष नेत्यांच्या आरोपांवर उत्तर दिले.

गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी कर्जमाफीसह अनेक निर्णय घेतले आहेत. आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. देशात कोव्हिडची गंभीर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आमच्या सरकारने अवघ्या आठ महिन्यात कर्जमाफी केली.

मागील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन वर्ष लावली होती. विरोधीपक्ष नेता आरोप करत नाही तोवर टीव्हीवाले त्यांना बघत नाहीत, हे त्यांना (प्रवीण दरेकरांना) चांगलंच माहीत आहे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

पाटील म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्याला अपघाती विमा कवच दिले असून याची सर्व जबाबदारी राज्य शासनाने उचलली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनाबाबत जळगावचा रिकव्हरी रेट वाढला असून तो आता 50 टक्क्यांवरून 85 टक्के इतका वाढला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, सर्वात कठीण निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कधी लढू नये. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे भाजीवरचं तरण असतं.

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; दरेकरांचा आरोप

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, औरंगाबाद दौऱ्यात दरेकरांची मागणी

(Gulabrao Patil slams Pravin Darekar over Farmers loan waiver)

Published On - 3:40 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI