AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; दरेकरांचा आरोप

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेलं नाही. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. या घटनेची कुणीच पाठराखण केली नाही आणि करणारही नाही, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशातील घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण; दरेकरांचा आरोप
| Edited By: | Updated on: Oct 03, 2020 | 11:15 PM
Share

जालना: हाथरस येथील बलात्कार आणि हत्याकांडाची चौकशी झालीच पाहिजे. तशी मागणीही आम्ही केली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. (pravin darekar on hathras gang rape case)

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर बदनापूरला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं. उत्तर प्रदेशातील घटना दुर्देवीच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, विरोधक उत्तर प्रदेशातील या घटनेवरून राजकारण करत आहेत, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेलं नाही. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार असलं तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. या घटनेची कुणीच पाठराखण केली नाही आणि करणारही नाही, असं दरेकर यांनी सांगितलं.

तेव्हा राऊत कुठे होते?

हाथरस प्रकरणावर पंतप्रधान का बोलत नाहीत? या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही दरेकर यांनी यावेळी समाचार घेतला. रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला दरीत फेकून देण्यात आले. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का? क्वॉरंटाइन सेंटरमध्ये बलात्कार होता आहेत. त्यावर चकार शब्द काढला जात नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातील घटनेवरून मात्र महाराष्ट्रात राजकारण केलं जात असून या लोकांची करणी आणि कथनी यात अंतर आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. हाथरसमध्ये मीडियाला जाण्यापासून रोखणे चुकीचे असून मीडियामुळे अनेक प्रश्नमार्गी लागतात, असंही ते म्हणाले. (pravin darekar on hathras gang rape case)

दरम्यान, राज्यातील सरकार पाच वर्षे पूर्ण करो अथवा न करो त्याच्याशी आमचे काही देणं घेणं नाही. महाराष्ट्रातील जनता आज वेगवेगळ्या संकटाने ग्रासलेली आहे. आज कोविड सारखं संकट आहे. त्याचा प्रादूर्भाव ग्रामीण भागात पसरतोय. निसर्ग वादळ कोकणात झालं. विदर्भ,मराठवाड्यात अतिवृष्टी झाली सरकार न्याय देत नाही, त्यामुळे आम्ही स्वत: नागरिकांना भेटून दिलासा देत आहोत, असं दरेकर म्हणाले.

सरकार घरात बसलंय

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर गेला. चार महिने झाले. अद्यापही पंचनामे झाले नाहीत. सरसकट पंचनामे झाले नाहीत. अनेक लोक वंचित आहेत. जिल्हा प्रशासन पोस्टमनच काम करत आहे. वादळ आणि अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. सरकार काम करत नाही म्हणून आपल्याला मराठवाड्यात यावं लागलं .सरकार घरात बसलं आहे. आम्ही विरोधी पक्ष फिरतोय. कोविडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वत: फिरत होते. आरोग्य सेवेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून देत होते. पण सरकार घरात बसलं आहे, त्यांना या सर्व गोष्टींचं काहीही पडलं नाही, अशी खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

गोंधळलेलं सरकार

आठवडाभरात शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर भारतीय जनता पक्ष टोकाचा संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यसरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने केंद्राने मदत करण्याची मागणी होत आहे. या मागणीचाही त्यांनी समाचार घेतला. राज्यकर्त्यानी कधीच रडत बसायचं नसतं. पैसे उभारण्याची क्षमता आपल्या राज्यात आहे. पंतप्रधान मोदी यांनी दीड टक्क्यांचे रिलॅक्शेसन दिले आहे. त्यातून दीड लाख कोटी रुपये आपण उभारू शकतो. पण हे सरकार रडत बसले आहे. भांबावले आहे. नेमकं काय करावं, कसं करावं? हे त्यांना समजत नाही. हे गोंधळलेलं सरकार आहे, अशी टीका करतानाच राज्यात कोव्हिड सेंटर, हॉस्पिटल आणि क्वॉरंटाइन सेंटरमद्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पोलिसांनी धमकावलं, पीडित कुटुंबाचा गंभीर आरोप; हाथरसमधून ‘टीव्ही9 मराठी’चा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

Headlines | हाथरसचे SP आणि इतर चौघे निलंबित

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

(pravin darekar on hathras gang rape case)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.