गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष?

मुंबई : बॉलिव़ूडचे बॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन ग्रोवर फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) नवे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गुलशन ग्रोवर यांना सुभाष घई यांच्या ‘राम लखन’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे या पदावर निवड करण्यात येणार आहे. गुलशन ग्रोवर चार दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 400 […]

गुलशन ग्रोवर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : बॉलिव़ूडचे बॅडमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन ग्रोवर फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) नवे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार गुलशन ग्रोवर यांना सुभाष घई यांच्या ‘राम लखन’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे या पदावर निवड करण्यात येणार आहे. गुलशन ग्रोवर चार दशके हिंदी सिनेमामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 400 पेक्षा अधिक चित्रपटात आपल्या अभिनयांची छाप पाडली आहे. विशेष म्हणजे गुलशन यांनी हिंदी चित्रपटांशिवाय इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि नेपाळी चित्रपटातही काम केले आहे.

करियरच्या सुरुवातीला गुलशन ग्रोव्हर हे अभिनयाचे शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक बॉलीवूड मधील कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले आहे. ज्यामध्ये संजय दत्त, विजेता पंडित, सनी देओल, कुमार गौरव आणि टीना मुनीम सारख्या सुपरस्टार कलाकरांना प्रशिक्षण दिले आहे.

याआधी अनुपम खेर या एफटीआयआयच्या अध्यक्षपदावर होते. मात्र त्यांनी 31 ऑक्टोबरला आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अनुपम खेर आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आणि नवीन आतरंराष्ट्रीय शो ‘न्यू अॅम्सरडॅम’चे कारण देत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या नवीन शोची शूटींग चालू असल्यामुळे मला एफटीआयआयच्या मॅनेजमेंट आणि विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाही असे कारण त्यांनी आपल्या राजीनाम्यात दिलं आहे. अनुपम खेर यांना राजीनामा देऊन एक महीना झाला आहे.

एफटीआयआय संस्थेवर अनुपम खेर यांच्या आधी गजेंद्र चौहान होते. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाने नियुक्ती केली होती. मात्र चौहान यांचं सिनेसृष्टीतील योगदान काय असा सवाल करत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे बराच वाद झाला होता. मात्र तरीही चौहान यांना अभय देण्यात आलं होतं. चौहान यांची मुदत संपल्यानंतर हे पद सुमारे सहा महिने रिक्त होते. या पार्श्वभूमीवर वाद टाळण्यासाठी खेर यांची 2017 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.