Bharati Singh | ‘आपण एकत्र असताना कसलीच चिंता नाही’, पती हर्षची भारतीसाठी भावनिक पोस्ट!

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हर्ष लिंबाचिया याने पत्नी भारती सिंहसाठी एक खास भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे.

Bharati Singh | ‘आपण एकत्र असताना कसलीच चिंता नाही’, पती हर्षची भारतीसाठी भावनिक पोस्ट!
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 12:20 PM

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हर्ष लिंबाचिया याने पत्नी भारती सिंहसाठी एक खास भावनिक पोस्ट (Emotional Post) शेअर केली आहे. यासोबतच त्यांने भारतीबरोबर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत (Haarsh Limbachiyaa writes emotional post for wife Bharti Singh).

या छायाचित्रांमध्ये हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह रोमँटिक शैलीत दिसत आहेत. इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपण एकत्र असताना कशाचीही चिंता नाही.’ या फोटोंमध्ये हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांचे पती-पत्नी म्हणून बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे.

(Haarsh Limbachiyaa writes emotional post for wife Bharti Singh)

ड्रग्ज प्रकरणात पती-पत्नीचे नाव

ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. चौकशी दरम्यान भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. मात्र, यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

करिअरवर परिणाम

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री भारती सिंहचे नाव समोर आल्यानंतर, तिला अटकही करण्यात आली होती. या सगळ्याचा परिणाम आता तिच्या करिअरवर देखील झाला असल्याचे बोलले जात आहे. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमातून हकालपट्टी झाल्याचे कळते आहे (Haarsh Limbachiyaa writes emotional post for wife Bharti Singh).

भारतीला जाऊ देणार नाही…

‘काहीही झाले तरी कपिल आणि मी नेहमी भारती सिंहबरोबर उभे राहू. काहीही झाले तरी, मी भारतीचे समर्थन करीन. ती कामावर परत आलीच पाहिजे. जे व्हायचे ते होऊ दे. मी आणि कपिल, किंबहुना आम्ही सगळेच भारती आणि हर्ष यांच्यासमवेत उभे आहोत. तीला माझे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि चॅनेलने आतापर्यंत असे कोणतेही पाऊल उचललेले नाही. आम्हालाही याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही’, असे कृष्णा अभिषेक याने म्हटले आहे.

कपिल शर्माही वाहिनीच्या निर्णया विरोधात…

कपिल शर्माच्या अडचणीच्या वेळी भारती सिंहने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. अलीकडे, जेव्हा कपिल आजारी पडला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या शोवर होत होता. त्यावेळी भारतीने त्याची मदत केली होती. कपिल आणि भारती दोघेही पंजाबचे आहेत. कपिल भारतीला त्याची छोटी बहीण मानतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अडचणीच्या वेळी हा शो भारतींकडून काढून घेतला जाऊ नये, अशी त्याची इच्छा आहे.

(Haarsh Limbachiyaa writes emotional post for wife Bharti Singh)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.