AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅण्डसम तरुणांचं करिअर धोक्यात: सर्व्हे

मुंबई : जगभरतील हॅण्डसम मुलांसाठी एक दुखद बातमी आहे. तुमची सुंदरता आता तुमच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करु शकते. हो, आता केवळ ऑफिस पॉलिटिक्स, कामचुकारी, कार्यशैलीच नाही तर तुमचं हॅण्डसम असणंदेखील तुमच्या करिअरसाठी घातक ठरु शकतं. एका सर्व्हेनुसार, हॅण्डसम मुलांना इतरांच्या तुलनेत प्रमोशन कमी मिळतात. याचं कारण म्हणजे त्यांचं हण्डसम असणं. लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि अमेरिकेच्या […]

हॅण्डसम तरुणांचं करिअर धोक्यात: सर्व्हे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

मुंबई : जगभरतील हॅण्डसम मुलांसाठी एक दुखद बातमी आहे. तुमची सुंदरता आता तुमच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करु शकते. हो, आता केवळ ऑफिस पॉलिटिक्स, कामचुकारी, कार्यशैलीच नाही तर तुमचं हॅण्डसम असणंदेखील तुमच्या करिअरसाठी घातक ठरु शकतं. एका सर्व्हेनुसार, हॅण्डसम मुलांना इतरांच्या तुलनेत प्रमोशन कमी मिळतात. याचं कारण म्हणजे त्यांचं हण्डसम असणं.

लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि अमेरिकेच्या मेरिलँड विश्वविद्यालयने केलेल्या एका सर्व्हेनुसार, कुठल्याही कंपनीच्या बॉससाठी हण्डसम पुरुष हे त्यांच्या पदासाठी धोकादायक मानले जातात. त्यामुळे हण्डसम मुलांना सहसा कंपनीत एखादं महत्वाचं पद मिळण्याची शक्यता कमी असते किंवा त्यांना प्रमोशन मिळत नाही. म्हणजे तुम्ही कामात कितीही चांगले असाल तरीही तुमचं हण्डसम असणं तुम्हाला माहाग पडू शकतं.

मेरिलँड विश्वविद्यालयाचे प्रमुख संशोधक/अभ्यासक प्रोफेसर सन यंग ली यांच्या मते, या सर्व्हेत असे दिसून आले की, जेव्हा एखादा पुरुष दुसऱ्या कुठल्या पुरुषाला नोकरीवर घेत असतो, तेव्हा त्यांचा कल हा हण्डसम पुरुषांविरोधात असतो. म्हणजे हॅण्डसम पुरुषांना नोकरी देण्यास एकप्रकारे नकार असतो. समोरच्या पुरुषाच्या सुंदरतेवर त्याला घ्यायचे की नाही हे ठरवले जाते. यामुळे हॅण्डसम असेल, मात्र जो खरंच योग्य असेल त्याला नोकरी मिळतच नाही. शिवाय प्रमोशनपासूनही लांब रहावं लागतं.

मग आता उद्यापासून ऑफिसला स्टड बनून जायचं की, डोक्याला तेल लावून जायचं हे तुम्हीच ठरवा, कारण प्रश्न प्रमोशनचा आहे..!

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा