हार्ले डेव्हीडसन खरंच भारताला अलविदा करतेय का?

हार्ले डेव्हीडसननं आता भारतातून गाशा गुंडाळला आहे. (Harley Devidson Exits India)

हार्ले डेव्हीडसन खरंच भारताला अलविदा करतेय का?

मुंबई : हार्ले डेव्हीडसन बाईकने अनेक चाहत्यांना भुरळ घातली. ज्या बाईकचा कॅप्टन कूल धोनीही जबरा फॅन आहे. तसंच जी बाईक घेणं प्रत्येक बाईकप्रेमीचं स्वप्न असतं. आणि जी कंपनी बाईक विश्वावर राज्य करते ती हार्ले डेव्हीडसन… याच हार्ले डेव्हीडसननं आता भारतातून गाशा गुंडाळला आहे. (Harley Devidson Exits India)

गेल्या वर्षी हार्ले कंपनीला तब्बल 22 टक्क्यांपर्यंत तोटा झाला. त्यामुळंच तोट्याचा बाजार सोडून हार्ले आपल्या अमेरिकेतीलच व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहे. 2019 मध्ये हार्लेनं फक्त 2 हजार 676 बाईक्स विकल्या. त्यामध्येही 65 टक्क्यांहुन अधिक बाईक्स या 750 सीसीच्या होत्या. या गाड्यांची असेंबलिंग हरयाणात होत होती. गेल्या 4 वर्षात भारतीय बाजारातून काढता पाय घेणारी हार्ले ही 7 वी कंपनी ठरलीय. याआधी जनरल मोटर्स, फिएट, सॅनयॉन्ग, स्कैनिया यासह अनेक कंपन्यांनी गाशा गुंडाळलाय.

परदेशी कंपन्या भारतात फेल का होतात?

ऑटो एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार, भारतीय बाजारांची अपुरी माहिती हा या कारणातील महत्त्वाचा घटक आहे. मारुती सुझुकीनं भारतीय ग्राहकांची गरज ओळखली, बाजाराचा अभ्यास केला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून कारच्या क्षेत्रात 50 टक्क्यांहुन अधिक हिस्सेदारी एकट्या मारुती सुझुकीची आहे.

हार्ले कंपनीला बाजारात अगदी स्वस्त आणि अधिक फिचर असणाऱ्या हिरो आणि बजाज या कंपन्यांनी मोठी टक्कर दिली. हार्ले कंपनीच्या बाईक्सची किंमत लाखोंच्या घरात आहे. श्रीमंत वर्ग ही बाईक्स घेईल अशी अपेक्षा असते, मात्र इथंही ग्राहकांनी हार्ले ऐवजी बुलेटला पसंती दिली.

हार्लेनं गाशा गुंडाळला असला तरी हार्लेप्रेमींनी नाराज होण्याची गरज नाही. कारण हार्ले हिरो, बजाज किंवा महिंद्रासोबत करार करणार आहे. अशाप्रकारे ही कंपनी भारतीय बाजारात आपलं अस्तित्त्व टिकवणार आहे.

(Harley Devidson Exits India)

संबंधित बातम्या

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

हार्ले डेविड्सनची किंमत वाढवल्यामुळे ट्रम्प भारतावर नाराज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI