तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

Domestic Violence of women for character in Kolhapurचारित्र्याच्या संशयावरुन शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे एका विवाहितेचे पती, सासू व दीर यांनी मिळून मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Domestic Violence of women for character in Kolhapur).

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 11:02 AM

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरुन शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे एका विवाहितेचे पती, सासू व दीर यांनी मिळून मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Domestic Violence of women for character in Kolhapur). याप्रकरणी पती, सासू, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिलेने आज (13 जून) याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी शांताबाई बागडी, मनोज बागडी आणि गणपती बागडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

तेरवाड येथील गंगापूर भागात एकत्र कुटुंबात राहणार्‍या पीडित महिलेला सासरच्या मंडळीनी तुझे वागणे बरोबर नाही, तुझे कोणाबरोबर तरी अनैतिक संबध आहेत असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर सासू शांताबाई बागडी व दीर गणपती बागडी यांनी तिला पकडून ठेवले. तसेच पती मनोज श्रीकांत बागडी याने कात्री आणि दाढी करण्याचा वस्ताऱ्याने डोक्यावरील केस कापून मुंडण केले. तसेच मारहाण करत अश्लिल शिवीगाळ केली. यानंतर पीडित महिलेने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यावरुन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पती सासू व दीर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश मुंगसे करत आहेत.

सासरचे लोक मागील 5 महिन्यांपासून त्रास देत होते. वारंवार शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती, असा आरोप पीडित महिनेले पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. चारित्र्याच्या संशयावरुन थेट महिलेचं मुंडण केल्याची घटना घडल्याने परिसरात याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे. तसेच अशा गुन्ह्यांवर जरब बसावी यासाठी प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या :

दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

Jalgaon Murder | दारु पिताना वाद, बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार, हॉटेल मालकाची हत्या

वडील पुतण्याकडे वास्तूशांतीसाठी, संधी साधत दारुड्या मुलाकडून आईचा खून

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

व्हिडीओ पाहा :

Domestic Violence of women for character in Kolhapur

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.