दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

जे.एन.पी.टी बंदरात दुबईहून खजूर भरुन आणल्याचे दाखवून परदेशी बनावटीच्या सिगारेट महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले (Cigarettes Seized in Dates Container) आहेत.

दुबईतील खजूराच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी, जेएनपीटी बंदरातून 11 कोटींचं घबाड जप्त

नवी मुंबई : उरणच्या जे. एन. पी. टी बंदरात महसूल गुप्तचर संचालनालयाने धडक कारवाई केली आहे. जे.एन.पी.टी बंदरात दुबईहून खजूर भरुन आणल्याचे दाखवून परदेशी बनावटीच्या सिगारेट महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहेत. याची किंमत सुमारे 11 कोटी 88 लाख रुपये इतकी आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी ही कारवाई केली. (JNPT Port Imported Cigarettes Seized in Dates Container)

महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या माहितीनुसार, एका 40 फूट कंटेनरमध्ये 600 मास्टर बॉक्समध्ये लपवलेल्या 32 हजार 640 कार्टेन्समध्ये 71 लाख 61 हजार 600 सिगारेट पाकिटांमध्ये हा माल आणला होता. या प्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने दोघांना अटक केली. त्यांना 25 जूनपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

पनवेलच्या नवकार गोदामामध्ये हा कंटेनर फोडून तपासणी केली. त्यावेळी हे घबाड मिळाल्याची माहिती खास सूत्रांकडून डी.आर.आयला मिळाली होती.

जगात सध्या कोरोनाचे सावट आहे. भारतातही मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या अगदी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सिगारेट विक्रीसह दारु बंदी करण्यात आली आहे. त्यातच बहुतांशी बंदरांमधील कामकाज कमी मनुष्यबळावर सुरु आहे. याच संधीचा फायदा घेत पुन्हा एकदा तस्कर कार्यरत झाल्याची शंका उपस्थित केली जातं आहे.

जे. एन. पी. टी. बंदराच्या माध्यमातून दुबई येथून खजूर मागविलेल्या एका आयातदाराने खजुरांच्या जागी परदेशी सिगारेट आणल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर दुबईहून आलेल्या 40 फुटी कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हे कोट्यावधी रुपये किमतीचे सिगारेटचे घबाड मिळून आले.

भारतीय बाजारपेठेतील किंमतीनुसार या परदेशी सिगारेटसची किंमत सुमारे 11 कोटी 88 लाखांची असल्याचं बोललं जातं आहे. या वृत्ताला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोणत्याही अधिकारी वर्गाने दुजोरा दिलेला नाही. मात्र गोदामांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईचे फोटो व्हायरल झाले आहे. तसेच फेसबूकसारख्या सोशल मीडियावर देखील टाकण्यात आले आहेत. मात्र जे. एन. पी. टी बंदरातील महसूल गुप्तचर संचालनालयाने स्थानिक पत्रकारांना याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. (JNPT Port Imported Cigarettes Seized in Dates Container)

संबंधित बातम्या : 

Jalgaon Murder | दारु पिताना वाद, बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार, हॉटेल मालकाची हत्या

वडील पुतण्याकडे वास्तूशांतीसाठी, संधी साधत दारुड्या मुलाकडून आईचा खून

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *