Jalgaon Murder | दारु पिताना वाद, बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार, हॉटेल मालकाची हत्या

दारु पिताना झालेल्या वादात दोन तरुणांनी बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार करत हॉटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली

Jalgaon Murder | दारु पिताना वाद, बिअरच्या फुटलेल्या बाटलीने मानेवर वार, हॉटेल मालकाची हत्या

जळगाव : दारु पिताना झालेल्या वादात दोन तरुणांनी बिअरच्या (Jalgaon Hotel Owner Murder) फुटलेल्या बाटलीने मानेवर वार करत हॉटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आज (12 जून) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलमध्ये घडली. प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय 50असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. भरदिवसा ही थरारक घटना घडल्याने शहरात एकच खळबळ (Jalgaon Hotel Owner Murder) उडाली आहे.

जळगावात शुक्रवारी (12 जून) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नेरीनाका स्मशानभूमीजवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलमध्ये दोन तरुण दारु पीत बसले होते. यावेळी त्यांचा हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्याशी कुठल्यातरी विषयावरुन वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत दोन्ही तरुणांनी प्रदीप चिरमाडे यांच्या मानेवर बिअरच्या फुटलेल्या बाटलीने वार केले. त्यामुळे चिरमाडे गंभीर जखमी झाले (Jalgaon Hotel Owner Murder).

रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने ते खाली कोसळले. यानंतर हल्लेखोर दोन्ही तरुण घटनास्थळावरुन पळून गेले. या घटनेत इतर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही कळायच्या आतच हा थरार घडला. नंतर जखमी अवस्थेत प्रदीप चिरमाडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं(Jalgaon Hotel Owner Murder).

संबंधित बातम्या :

लग्नाच्या पहिल्याच रात्री हत्येचा थरार, पत्नीचा जीव घेऊन 24 वर्षीय तरुणाचा गळफास

औरंगाबादेतील सख्ख्या बहीण-भावाच्या हत्येचा उलगडा, चुलत भावाला अटक

नाशिकच्या मंदिरात तांब्या-पितळेच्या वस्तूंची चोरी, चप्पल काढून चोर देवघरात, घटना सीसीटीव्हीत कैद

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *