Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

ईडीने असा दावा केला आहे की संपूर्ण प्रकरण पेटवण्यासाठी एकूण 100 कोटींचा निधी दिला गेला आहे.

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या घटनेला जातीय रंग देण्यासाठी आणि दंगली पसरवण्यासाठी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाकडे (PFI)  मॉरिशसमधून तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी आला आहे. ईडीने असा दावा केला आहे की संपूर्ण प्रकरण पेटवण्यासाठी एकूण 100 कोटींचा निधी दिला गेला आहे. (hathras case 100 crore fund from Mauritius for spreading ethnic riots)

खरंतर, हाथरस प्रकरणात दंगल पसरवण्याच्या आरोपाखाली मेरठमधून चार संशयितांना अटक करण्यात आली होती. या चौघांचाही पीएफआय संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून काही भडकाऊ साहित्य हस्तगत केलं आहे. याआधाही उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वेबसाईटच्या आधारे दंगली भडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला होता.

हाथरस पीडितेला न्याय मिळावा यासाठी बनवलेल्या वेबसाईटवर आक्षेपार्ह गोष्टी शेअर करण्यात आल्या आहेत. ईडीने हाथरसमधील हिंसाचाराचा कट रचण्याच्या मुद्द्यावर गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासणीत असं दिसून आले आहे की, यूपीमध्ये जातीय हिंसा भडकवण्यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी देण्यात आला होता.

काय आहे यूपी सरकारचा दावा यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा डागाळण्यासाठी जस्टिस फॉर हाथरस नावाची वेबसाईट एका रात्रीत तयार केली गेली. बनावट आयडीद्वारे हजारो लोकांना वेबसाइटवर जोडलं गेलं. विरोधात प्रदर्शन करण्यासाठी या वेबसाईटवर देशात आणि प्रदेशात दंगल करण्यासाठी आणि दंगलीतून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर दंगली करणाऱ्यांना मदत म्हणून निधी गोळा केला जात आहे. (hathras case 100 crore fund from Mauritius for spreading ethnic riots)

या निधीतून अफाव पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याचे अनेक पुरावे तुम्हाला सोशल माध्यमांवर मिळतील. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, वेबसाईटवर मास्क लावून विरोध करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचं धोरण असल्याचं सांगितलं आहे. लोकांमध्ये फूट पाडून आणि देशाबद्दल द्वेश निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या – 

Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार

कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत, आरोग्य मंत्रालयाचा आदेश

(hathras case 100 crore fund from Mauritius for spreading ethnic riots)

Published On - 2:42 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI