AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल, नेमकं कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण आले आहे. पीडितेचा भाऊ आणि मुख्य आरोपी यांच्यात तब्बल 104 वेळा फोन कॉल झाल्याचे समोर आले आहे. (phone calls between the victim's brother and the main accused)

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल, नेमकं कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न
| Updated on: Oct 06, 2020 | 10:47 PM
Share

लखनऊ : हाथरस बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पीडितेचा भाऊ आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये तब्बल 104 वेळा फोन कॉल झाल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात ही बाब उघड झाली असून, वारंवार फोन करण्याचे नेमके काय कारण असेल?, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Hathras gangrape case 104 phone calls between the victim’s brother and the main accused)

हाथरस बलात्कार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका होत आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा तपास सुरु आहे. अशातच बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेच्या भावात 104 वेळा फोन कॉल झाल्याचे समोर आले आहे.

मागील एका वर्षापासून फोन कॉल सुरु असल्याची माहिती

मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेचा भाऊ यांच्यामध्ये मागील एका वर्षापासून फोन कॉल सुरु होते. 13 ऑक्टोबर 2019 पासून या दोघांमध्ये बोलणं सुरु झाल्याचे तपासातून समोर आले आहे. एकूम कॉलपैकी 62 कॉल पीडितेच्या भावाने स्व:तहून (आऊटगोईंग कॉल) केलेले आहेत. तर आरोपी संदीपने पीडितेच्या भावाला 42 वेळा फोन केला आहे. तसेच बहुतांश फोन कॉल चंदपा या परिसरातून असलेल्या फोन कॉल टॉवरवरुन जोडण्यात आले आहेत. चंदपा हा भाग पीडितेच्या गावापासून फक्त दोन किमी अंतरावर आहे. या सर्व फोन कॉलचे रेकॉर्ड्स पाहता, पीडता आणि मुख्य आरोपी संपर्कात असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे हाथरस प्रकरण? हाथरमध्ये 14 सप्टेंबरला 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर तब्बल 2 आठवडे पीडित तरुणी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत होती. पण अखेर तिची आयुष्याची झुंज अपयशी ठरली. याचवेळी पोलीस प्रशासनाने रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ज्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानुसार हाथरसच्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.

संबंधित बातम्या :

हाथरसप्रकरणी योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल, CBI चौकशीचे आदेश

Smriti Irani Live PC | हाथरस प्रकरणावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी

Hathras Case | हाथरस प्रकरणी पीडितेच्या घरातील, कुटुंबातील सदस्यांची प्रतिक्रिया

(Hathras gangrape case 104 phone calls between the victim’s brother and the main accused)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.