Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 3:41 PM

उत्तर प्रदेश : हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे (Hathras GangRape UP Police forcibly performs victims last rites alleged by family).

दिल्लीतील सफदरजंग रुगणालयात पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी (29 सप्टेंबर) उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून (UP Police) रात्री 12.45 वाजता पीडितेचा मृतदेह हाथरसमध्ये (hathras) आणण्यात आला. रुग्णवाहिका गावात येताच संतप्त गावकऱ्यांनी आक्रोश करत, विरोध प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. रस्त्यांवर आडवे होत गावकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी जबरदस्ती मध्यरात्रीच उरकले अंत्यसंस्कार

आपल्या मुलीचा मृतदेह घरी नेऊन, विधीवत तिचे अंत्यसंस्कार करता यावे, म्हणून पीडितेचे कुटुंब पोलिसांकडे विनवणी करत होते. आपल्या मुलीला शेवटचे डोळे भरून पाहता यावे, तिचा मृतदेह 15 मिनिटे तरी घरी नेण्यात यावा, अशी मागणी कुटुंब करत होते. मात्र, या सगळ्याला नकार देत, तब्बल 200 पोलिसांच्या ताफ्यासह तिचा मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्यात आला. (Hathras GangRape UP Police forcibly performs victims last rites alleged by family)

कुटुंबाची कुठलीही मागणी मान्य न करता, मध्यरात्री 2.30च्या दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती मुलीचे अंत्यसंस्कार उरकले. यावेळी 200 पोलिस तिच्या चितेभोवती घेरा करून उभे होते. अंत्यसंस्काराच्या वेळीही तिच्या कुटुंबियांना स्मशानभूमीत येण्यास मज्जाव करण्यात आला.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) या कृत्यामुळे संपूर्ण गाव संतप्त झाले असून, त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र, मुलीचे अंत्यसंस्कार तिच्या कुटुंबियांच्या सहमतीनेच झाले असल्याचे म्हणत, पोलिसांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

बलात्कारानंतर गळा आवळून हत्येचा प्रयत्न

यूपीच्या हाथरस (Hathras) जिल्ह्यात राहणारी मुलगी, 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, चार नराधमांनी तिला खेचत बाजूला नेले. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार (GangRape) केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. बोलता येऊ नये म्हणून पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले होते. 15 दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. 22 सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. तिने दिलेल्या जबाबावरून चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.

(Hathras GangRape UP Police forcibly performs victims last rites alleged by family)

संबंधित बातम्या : 

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.