AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | भारती सिंह, हर्ष लिंबाचियाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

कोर्ट दोघांना जामीन मंजूर करून दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ड्रग्ज प्रकरणात भारतीसह तिच्या पतीचे नाव समोर आल्याने दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला आहे.

Drugs Case | भारती सिंह, हर्ष लिंबाचियाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 23, 2020 | 10:38 AM
Share

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limachiyaa) यांच्या जामीन अर्जावर किल्ला कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. कोर्ट दोघांना जामीन मंजूर करून दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ड्रग्ज प्रकरणात भारतीसह तिच्या पतीचे नाव समोर आल्याने दोघांच्याही चाहत्यांना धक्का बसला आहे. आज न्यायालय त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे (Hearing on Bharti Singh and Harsh Limbachiyaa Bail Application).

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली होती. कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षची तळोजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता.

हर्षची तब्बल 17 तास चौकशी

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना थेट कोर्टात हजर केले गेले. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली.

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती (Hearing on Bharti Singh and Harsh Limbachiyaa Bail Application).

ड्रग्ज तस्कराने घेतले भारती-हर्षचे नाव

एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले.

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

(Hearing on Bharti Singh and Harsh Limbachiyaa Bail Application)

संबंधित बातम्या :

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

Follow Us
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं