AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : कोकणात मुसळधार पाऊस, रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोकणात मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे (Heavy rain in Konkan).

LIVE : कोकणात मुसळधार पाऊस, रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली
| Updated on: Aug 05, 2020 | 7:57 PM
Share

रायगड : कोकणात मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाड बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या 30 गावांचा संपर्क तुटला आहे (Heavy rain in Konkan).

LIVE UPDATE 

[svt-event title=”रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला” date=”05/08/2020,6:13PM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रोहा शहरातील अष्टमी पुलावरुन पाणी गेल्यामुळे रोहा शहराचा सपंर्क तुटला, रोहा, माणगाव, उरण, पनवेल, खालापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, रोहा शहरातील तसेच अष्टमी नाक्यावरील काही घरांमध्ये पाणी शिरले, कोणतीही जिवीतहानी नाही  [/svt-event]

[svt-event title=”माणगाव तालुक्यात काळ नदीला पूर, 70 ते 75 ग्रामसथ अडकले” date=”05/08/2020,6:23PM” class=”svt-cd-green” ] माणगाव तालुक्यात काळ नदीला पूर, सोन्याच्या वाडीला काळ नदीच्या पाण्याने चहूबाजूंनी वेढले, 70 ते 75 ग्रामसथ अडकले, रायगड पोलिसांचे शर्थीने प्रयत्न सुरु [/svt-event]

गावी जाणारे चाकरमानी रस्त्यातच अडकले

कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका गणोशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांना बसत आहे. माणगाव शहराजवळ घोड नदीचे पाणी कळमजे या पुलावरुन वाहू लागल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

दरम्यान, कळमजे पुलाची वाहतूक थांबवल्यानंतर ही वाहतूक कोलाड नाकाच्या पुढे भिरा नाका येथून वळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई दिशेने येणारी वाहतूकदेखील माणगाव येथील निजामपूर नाका येथून वळविण्यात आलेली आहे (Heavy rain in Konkan).

सोन्याची वाडीत 70 ते 75 ग्रामस्थ अडकले

माणगाव तालुक्यात काळ नदीला पूर आला आहे. गोरेगाव पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोन्याची वाडीला काळ नदीच्या पाण्याने चहूबाजूंनी वेढले आहे. त्यामुळे सोन्याची वाडीत 70 ते 75 ग्रामसथ अडकले आहेत. सर्व ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी रायगड पोलिसांचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली तरी अनेक नद्यांना पूर आला आहे. कुडाळ येथील भंगसाळ नदीला मोठा पूर आल्यामुळे पुराचे पाणी वस्तीमध्ये शिरले. कुडाळ लक्ष्मीवाडी काळप नाका येथील घराला पाण्याने वेढा घातला होता. यावेळी घरात अडकलेल्या कांबळी कुटुंबातील पाच जनांना कुडाळ पोलिसांच्या रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. यावेळी तीन श्वानही या घरात अडकले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. कणकवली-खारेपाटण सुखनदीला पूर आला आहे. त्यामुळे बाजारपेठेसह सर्वत्र पाणी शिरले आहे. सावंतवाडीच्या बांदा बाजारपेठेतही पाणी शिरले आहे. बाजारपेठेला नदीचे स्वरुप आले आहे. मदत करणारे स्वयंसेवक बाजारपेठेतून चक्क होडी चालवून मदत करत आहेत.

रत्नागिरीतही मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातही प्रचंड पाऊस कोसळत आहे. शिवनदी आणि विशिष्टी नदीला महापूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तब्बल सहा तास वाहतूक खोळंबली

मुसळधार पावसामुळे काजळी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. नदीचं पाणी पुलापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची वाहतूक सकाळी 11 वाजता बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर पावसाने थोडा उसंत घेतल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी थोडी खाली गेली. त्यामुळे तब्बल 6 तासांनी पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.