500 CCTV कॅमेरा, 10 हजार जवान, जिनपिंग यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून (11 ऑक्टोबर) 2 दिवसीय भारत दौऱ्यावर (Xi Jinping India Tour) आहेत.

500 CCTV कॅमेरा, 10 हजार जवान, जिनपिंग यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट सुरक्षा

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून (11 ऑक्टोबर) 2 दिवसीय भारत दौऱ्यावर (Xi Jinping India Tour) आहेत. जिनपिंग तामिळनाडूमधील महाबलीपुरम (Xi Jinping in Mahabalipuram) येथे येणार असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी 500 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 10 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे महाबलीपुरमला अगदी लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.

जिनपिंग यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जागोजागी तब्बल 500 कॅमेरांच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी 9 आयएएस अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या विभागांच्या 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे के राष्ट्रपती शी जिनपिंग मामल्लपुरम (महाबलीपुरम) येथे अनौपचारिक भेट घेतील. जिनपिंग 11-12 ऑक्टोबरदरम्यान भारत दौऱ्यावर असणार आहे. यावेळी ते महाबलीपुरममध्ये पंतप्रधान मोदींसोबत दुसरी अनौपचारिक शिखर बैठक करतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जिनपिंग मोदींसोबत बैठकीनंतर चेन्नईचा दौरा करणार असल्याचं सांगितलं.

मोदी आणि जिनपिंग यांच्यात याआधी पहली अनौपचारिक शिखर बैठक चीनमधील वुहानमध्ये 27-28 एप्रिल 2018 मध्ये झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI