AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर

राज्यातलं सरकार हे अमर अकबर अँथोनीचं सरकार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तितक्याच शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिलंय.

दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर
| Updated on: Oct 07, 2020 | 5:45 PM
Share

मुंबई :  महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तितक्याच शायराना अंदाजात उत्तर दिलंय. (Home Minister Anil Deshmukh reply Raosaheb Danve On his Amar Akbar Anthony Statement)

रावसाहेब दानवे यांच्या टीकेला अनिल देशमुख यांनी उत्तर देताना म्हटलंय,  “दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !”

रावसाहेब दानवे यांनी ‘अमर अकबर अँथोनी’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचं हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली होती. तसंच महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असं दानवे म्हटले होते.

दानवेंच्या टीकेला गृहमंत्र्यांचं शायराना अंदाजात प्रत्युत्तर

“दानवे म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी!

रावसाहेब दानवे यांची महाविकास आघाडीवर टीका

महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल, अशी जोरदार टीका दानवे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

दानवेंच्या टीकेला काँग्रेसचं उत्तर

रावसाहेब दानवेंच्या टीकेला काँग्रेसने देखील उत्तर दिलं आहे. “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत, असं भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” अशा शब्दात महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दानवेंना उत्तर दिलं होतं.

(Home Minister Anil Deshmukh reply Raosaheb Danve On his Amar Akbar Anthony Statement)

संबंधित बातम्या

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.