Hotels Lodge Reopening : कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी

महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. नुकतंच मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी (Hotel Lodge ReStart Again In Maharashtra) केले.

Hotels Lodge Reopening : कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी
Follow us
| Updated on: Jul 06, 2020 | 5:45 PM

मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल आणि लॉज सुरु करण्याची परवानगी मिळाली (Hotels Lodge Reopening In Maharashtra) आहे. येत्या 8 जुलैपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले जाणार आहेत. नुकतंच मुख्य सचिव यांनी याबाबतचे आदेश जारी केले. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या तरी हॉटेल आणि लॉज सुरु करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.

लॉज, गेस्ट हाऊस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स 33 टक्के क्षमतेसह चालवण्याची 8 जुलैपासून परवानगी देण्यात आली आहे.

जर या संस्था क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाईन सुविधेसाठीच वापरल्या जातील. किंवा त्यांचा उर्वरित भाग (67 टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहे.

सर्व संस्थांनी पुढील गोष्टींची व्यवस्था करावी

1) कोव्हिडपासून बचावासाठी उपाययोजनांची माहिती देणारे फलक/पोस्टर/एव्ही मीडिया दर्शनी भागात लावावेत. 2) हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्यरित्या नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्तुळे आखावीत. 3) प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक. रिसेप्शन टेबलजवळ प्रोटेक्शन ग्लास आवश्यक 4) पायाने वापरता येणारी (पेडल ऑपरेटेड) हँड सॅनिटायझर मशीन रिसेप्शन, गेस्ट रुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत. 5) फेस मास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी उपलब्ध करावीत. 6) चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी QR कोड, ऑनलाईन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्क वापरता येणारी प्रणाली ठेवावी. 7) सोशल डिस्टन्सिंग पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी. 8) एसी- सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. सर्व एअर कंडीशनचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. आर्द्रता 40 ते 70 टक्के राखावी. ताजी हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम (Hotels Lodge Reopening In Maharashtra) असावे.

पाहुण्यांसाठी सूचना

1. कोव्हिडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश 2. फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक 3. प्रवाशांचे तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थिती) आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक 4. आरोग्य सेतू अ‍ॅप वापरण्याची ग्राहकांना सक्ती 5. हाऊसकीपिंग सुविधा कमीत कमी वापरण्यावर ग्राहकांनी भर द्यावा.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशसोबत काल (5 जुलै) एक व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत हॉटेल आणि लॉज सुरु करण्यावर हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी त्यांनी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी एक कार्यपद्धती निश्चित केली आहे
  • लवकर ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार
  • पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान
  • हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल.
  • हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
  • एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात.
  • हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही.
  • मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल.
  • स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका.
  • कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत याची काळजी घ्यावी.

(Hotels Lodge Reopening In Maharashtra)

संबंधित बातम्या : 

राज्यातील हॉटेल-लॉज लवकरच सुरु करण्याचा विचार, मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

Mahajobs | उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना संधी, एमआयडीसीच्या ‘महाजॉब्स पोर्टल’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.