SSR Death Case | सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती NCB च्या ताब्यात, रियाच्या घराची झाडाझडती

सॅम्युअल मिरांडा हा जैद विलात्राकडून ड्रग्ज विकत घ्यायचा, अशी माहिती 'एनसीबी'च्या हाती लागली आहे.

SSR Death Case | सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती NCB च्या ताब्यात, रियाच्या घराची झाडाझडती

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी सर्च ॲापरेशन केले. सॅम्युअल मिरांडा ‘एनसीबी’च्या ताब्यात असून त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर रिया आणि शोविक चक्रवर्ती यांच्या घराची झाडाझडती केल्यानंतर ‘एनसीबी’ने शोविक चक्रवर्तीलाही ताब्यात घेतले. (House search of Showik Chakraborty and Samuel Miranda by NCB)

सॅम्युअल मिरांडा हा जैद विलात्राकडून ड्रग्ज विकत घ्यायचा, अशी माहिती ‘एनसीबी’च्या हाती लागली आहे. त्यानुसार सॅम्युलच्या घरी सर्च ॲापरेशन सुरु करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सॅम्युल मिरांडाला अटक करण्यासाठी एनसीबीकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घराचे सर्च ॲापरेशन झाले असून दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशीसाठी समन्स बजावले.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घराच्या परिसराची एनसीबीच्या टीमकडून झाडाझडती घेण्यात आली. घराची एन्ट्री-एक्झिट, पार्किंग एरिया, गार्डन एरिया, पटांगण आणि खिडक्या यांची एनसीबीकडून रेकी करण्यात आली. मुंबई पोलीस अधिकारी समीर वानखेडे, मुंबई पोलीस आणि सीबीआयचे समन्वय अधिकारी चक्रवर्ती कुटुंबाच्या घराबाहेर दाखल झाले होते.

संबंधित बातम्या :

आर्थिक व्यवहार, वॉटर स्टोन रिसॉर्ट आणि, ड्रग्स! सीबीआय चौकशीत काय काय झालं?

सीबीआयकडून रियाच्या वडिलांची सात तास, तर राधिका-श्रुती यांची समोरासमोर बसवून चौकशी

(House search of Showik Chakraborty and Samuel Miranda by NCB)

Published On - 10:18 am, Fri, 4 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI