घरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

आपला अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटलं जातं आहे. (HSC Girl Commit Suicide due to not get online study)

घरात तीन भावंडं, एकच मोबाईल, अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 10:02 PM

मनमाड (नाशिक) : ऑनलाइन शिक्षणात येत असलेल्या अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने विषारी औषध घेत आत्महत्या केली आहे. रेवती संजय बच्छाव असे तिचे नाव आहे. ती सटाणा महाविद्यालयात बारावीतील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. (HSC Girl Commit Suicide due to not get online study)

रेवती बच्छाव ही इयत्ता बारावीत शिकत होती. तिच्या घरातील परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यांच्या घरात एकच मोबाईल आणि तीन भावंडे शिकणार आहेत. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष होते. कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला आहे. मात्र बच्छाव यांच्या घरात एकच मोबाईल असल्याने तिला अभ्यास करण्यासाठी मोबाईल मिळत नसे. त्यामुळे आपला अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात आहे.

रेवतीचे आई-वडील दोघेही मजुरी करतात. त्यामुळे तीन पाल्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी ते मोबाईल पुरवू शकत नाहीत.

रेवतीच्या आत्महत्येने मनमाडमधील सटाणा येथे हळहळ व्यक्त होत आहे. सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शासन आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते दिनेश बच्छाव यांनी उपस्थित केला आहे. तसेच शासनाने तातडीने शाळा सुरु कराव्यात अशी मागणीही केली आहे.(HSC Girl Commit Suicide due to not get online study)

संबंधित बातम्या : 

भांडणाची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाची गळा चिरुन हत्या, 5 आरोपींना अटक

मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.