Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!

व्हिटामिन शरीराला योग्य प्रमाणात मिळावे, यासाठी आहारात काही घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता असते.

Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 6:22 PM

मुंबई : पौष्टिक आहार शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहारासह शरीराला व्हिटामिन (Vitamin) आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळणे आवश्यक असते. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. विशेषत: वाढत्या वयानुसार (Increasing age), शरीराची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत काही व्हिटामिन्स शरीरासाठी खूप महत्त्वाची ठरतात. हे व्हिटामिन शरीराला योग्य प्रमाणात मिळावे, यासाठी आहारात काही घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता असते (Human body needs more vitamins with increasing age).

कॅल्शियम

कॅल्शियम आपल्या शरीराला पोषण देणारा महत्त्वाचा घटक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. 50 वर्षांवरील स्त्रिया आणि 70 वर्षांपेक्षा जास्त पुरुषांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. कॅल्शियमचा अभाव आपल्या शरीराच्या स्नायू, पेशींमध्ये समस्या निर्माण करतो. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी रोजच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

व्हिटामिन बी 12

व्हिटामिन बी 12 रक्त वाढीत आणि पेशी तयार करण्यात मदत करते. मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य उत्पादनांमध्ये व्हिटामिन बी 12चे प्रमाण अधिक असते. याशिवाय व्हिटामिन बी 12 टॅब्लेट देखील उपलब्ध असतात. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे सेवन करता येते.( Human body needs more vitamins with increasing age)

व्हिटामिन डी

सूर्यप्रकाश हा ‘व्हिटामिन डी’चा उत्तम स्रोत आहे. परंतु, काही काळानंतर शरीर व्हिटामिन डी तयार करण्यास असक्षम असते. व्हिटामिन डीमुळे आपले स्नायू, पेशी आणि रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करते. बहुतेक खाण्यापिण्याचे पदार्थांमध्ये व्हिटामिन डी फारच कमी प्रमाणात आढळते. परंतु, सॅलमन, मॅकरेल आणि सार्डिन या माशांमध्ये व्हिटामिन डीचे प्रमाण अधिक असते. या शिवाय व्हिटामिन डीच्या टॅब्लेट देखील उपलब्ध असतात. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे सेवन करता येते.

व्हिटामिन बी 6

व्हिटामिन बी 6 शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी आणि जंतूंचा नाश करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. तसेच, व्हिटामिन बी 6 स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काम करते. कबुली चाण्यांमध्ये व्हिटामिन बी 6चे प्रमाण अधिक असते. याशिवाय फॅटी फिश ही व्हिटामिन बी 6चा उत्तम स्रोत आहेत.( Human body needs more vitamins with increasing age)

मॅग्नेशियम

शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्त्वाचे आहे. मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्याचे काम करते. बियायुक्त फळे, पालेभाज्या आणि नट्समध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. वाढत्या वयानुसार, लोक खाद्यपदार्थापेक्षा औषधांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. ज्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता निर्माण होते.

प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप लाभदायक आहेत. दही आणि आंबट पदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स आढळतात. मात्र कोणत्याही प्रकारचे प्रोबायोटिक घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रोबायोटिक्स अॅलर्जी आणि अतिसारपासून शरीराचे संरक्षण करते.( Human body needs more vitamins with increasing age)

ओमेगा 3

ओमेगा -3 आपल्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आपले शरीर नैसर्गिकरित्या ओमेगा-3 फॅटी अॅसिड तयार करू शकत नाही. ओमेगा -3 गाठ आणि अल्झायमरसारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते. फॅटी फिश, कॅनोला तेल, जवस आणि अक्रोड सारख्या पदार्थांमध्ये ओमेगा 3चे प्रमाण अधिक असते.

सेलेनियम

सेलेनियम पेशींना संसर्गापासून दूर ठेवते. या व्यतिरिक्त, सेलेनियम वृद्धावस्थेतील रोगांपासून शरीराचे संरक्षण करते. चिकन, मासे, अंडी, मशरूम, काजू आणि केळी या पदार्थांमध्ये सेलेनियमचे प्रमाण अधिक असते. सेलेनियम स्नायूंना बळकट करण्याचे कार्य करते.

(Human body needs more vitamins with increasing age)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.