लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे संसाराची सेटिंग बिघडली, नागपुरात पती-पत्नी वादाच्या तक्रारीत वाढ

लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांमधील अनैतिक संबंध समोर आले आहेत (Extramarital affair Nagpur).

लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे संसाराची सेटिंग बिघडली, नागपुरात पती-पत्नी वादाच्या तक्रारीत वाढ
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांच्या संसाराची सेटिंग बिघडल्याचं दिसत आहे. नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे 600 पेक्षा अधिक तक्रारी याबाबत आल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत (Extramarital affair Nagpur).

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नी 24 तास घरात बंदिस्त झाले होते. बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मीडियावर पती-पत्नीचं इतरांशी चॅटिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण यात अति चॅटिंगमुळे नागपुरात अनेक संसाराची सेटिंगच बिघडलेली आहे. अति चॅटिंगमुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात पती-पत्नीकडून 600 पेक्षा जास्त तक्रारी नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’कडे पोहोचल्या आहेत.

यातल्या काही केसेस घटस्फोटापर्यंतही पोहोचल्या आहेत. कोरोनाच्या काळात पती-पत्नीचे अनैतिक संबंधंही समोर आल्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं बंद असल्याने मित्र मैत्रीणी किंवा सहकाऱ्यांच्या संपर्कासाठी सोशल माध्यम हेच प्रभावी साधन ठरलं. पण याच सोशल मीडियावर अति चॅटिंगमुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध समोर आलेत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे सोशल माध्यमांवर अति चॅटिंग सुखी संसारात विष कालवत असल्याची बाब लक्षात आली आहे.

दरम्याम, लॉकडाऊनमुळे चीनमध्येही अनेक पती-पत्नींच्या भांडणात वाढ झाली आहे आणि घटस्फोटाच्या प्रमाणातही मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पती-पत्नी घरात बंदिस्त आहेत. त्यामुळे सतत त्यांच्यात वाद होत असल्याने घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तांनी दिले आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ

पती मुंबईत, पत्नी सोलापुरात, कौटुंबीक न्यायालयाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घटस्फोट

Published On - 10:57 am, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI