AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ

कोरोना व्हायरस संसर्गाचे जगभरात अनेक पडसाद पडत आहेत. त्यात आता आणखी एक आश्चर्यचकित करणारा परिणामही चीनमध्ये समोर आला आहे (Marriage divorce application after Corona).

कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ
| Updated on: Mar 16, 2020 | 10:50 AM
Share

बिजिंग : कोरोना व्हायरस संसर्गाचे जगभरात अनेक पडसाद पडत आहेत. त्यात आता आणखी एक आश्चर्यचकित करणारा परिणामही चीनमध्ये समोर आला आहे (Marriage divorce application after Corona). चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यामुळे घराबाहेर पडण्यावरही निर्बंध लादण्यात आले. यानंतर घरात बंद असलेल्या दाम्पत्यांच्या भांडणांमध्ये वाढ झाली आहे. याच वादातून चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जाच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

चीनमध्ये कोरोना घटस्फोटाचंही कारण बनत आहे. चीनच्या शिचुआन प्रांतामध्ये मागील एका महिन्यात 300 हून अधिक जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोना व्हायरसमुळे चीनमधील बहुतेक लोक आपआपल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यातूनच पती-पत्नींमध्ये वादाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अगदी घटस्फोटाची स्थिती देखील तयार होत आहे.

हेही वाचा : इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, ‘इथे’ होणार रवानगी

डाझोऊ परिसरातील लग्न नोंदणी कार्यालयाचे व्यवस्थापक लू शिजून यांनी सांगितलं, “शेकडो दाम्पत्ये आपलं लग्न मोडून घटस्फोटाचा विचार करत आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत. यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये पती-पत्नी घरात बराचकाळ एकत्र थांबून झालेल्या वादांचं कारण आहे. असं असलं तरी सरकारी अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसमुळे ऑफिस बंद असल्यानेच प्रलंबित घटस्फोट प्रकरणांची संख्या वाढल्याचा दावा केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इटलीत इंटरनेटच्या मागणीत वाढ

इटलीमध्ये नागरिकांवर आपल्या घरात कैद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इटलीत इंटरनेटच्या मागणी 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. लोक वेबसीरीज पाहून आणि ऑनलाईन गेम खेळून आपला वेळ घालवत आहेत. चीननंतर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या इटलीमध्ये आहे.

संबंधित बातम्या:

संबंधित बातम्या :

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील

Marriage divorce application after Corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.