AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीत पती-पत्नीमध्ये टोकाचा वाद, पत्नीवर चाकू हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पत्नीवर चाकू हल्ला केल्यानंतर पतीने रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ऐन दिवाळीत पती-पत्नीमध्ये टोकाचा वाद, पत्नीवर चाकू हल्ला करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या
| Edited By: | Updated on: Nov 12, 2020 | 12:34 PM
Share

पनवेल : ऐन दिवाळीत पनवेलमधून गुन्ह्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधल्या तळोजा इथं पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पत्नीवर चाकू हल्ला केल्यानंतर पतीने रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (husband attack on wife and then attempt suicide in panvel crime)

दिवाळीच्या खास सणालाच पती-पत्नीमध्ये वाद शुल्लक कारणावरून वाद झाला. हा शाब्दिक वाद इतका गेला की यामध्ये पतीने रागाच्या भरात पत्नीच्या पोटात चाकू भोकसून स्वतः तळोजा रेल्वे ट्रॅकखाली आत्महत्या केली आहे. सकाळी साडे आठ वाजता नावडे फेस 1 इथं ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा फेस 1 मध्ये निलकमल अपार्टमेंटमध्ये अर्चना निर्गुडे आणि पती गणेश दुर्गुडे राहत होते. पण सणासुदीच्या दिवशीच दोघांमध्ये घरगुती कारणामुळे टोकाचा वाद झाला. गंभीर म्हणजे चाकू हल्ला करून पत्नीला ठार करण्याच्या प्रयत्नात अर्चना गंभीर जखमी झाली. सदर घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. तर अर्चना दुर्गुडे यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

पत्नीवर वार केल्यानंतर आरोपी पती गणेश याने तळोजा रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नेमका वाद इतक्या टोकाला का गेला? याबाबत तळोजा पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुल्लक वादामध्ये ऐवढा मोठा गुन्हा का घडला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी शेजारी आणि प्रत्येक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या –

मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, 13 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा

शौचास गेलेल्या महिलेवर हल्ला करुन डोळा काढणाऱ्या नराधमाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कामगिरी

(husband attack on wife and then attempt suicide in panvel crime)

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.