जीन्स-टीशर्ट घातल्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न, डोंबिवलीत तरुणाला अटक

पत्नी जीन्स आणि टीशर्ट घालून कामावर जाते म्हणून पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न (Husband beaten Wife dombivali) केला.

जीन्स-टीशर्ट घातल्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न, डोंबिवलीत तरुणाला अटक

ठाणे : पत्नी जीन्स आणि टीशर्ट घालून कामावर जाते म्हणून पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न (Husband beaten Wife dombivali) केला. ही धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. सुजाता जाधव असं महिलेचं नाव असून आरोपी पती सुधीर जाधव याला पोलिसांनी अटक (Husband beaten Wife dombivali) केली आहे.

सुजाता (10 डिसेंबर) रात्री कामावरुन घरी परतली. कपड्यांवरुन पुन्हा नवरा-बायकोमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सुधीरने सुजाताचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी बेशुद्ध पडली. ती मयत झाल्याचे समजून पती सुधीर स्वत: रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला.

सुधीर जाधव हा आपली पत्नी सुजातासोबत डोंबिवलीजवळील कोपर परिसरात राहतो. दोघा नवरा-बायकोमध्ये नेहमी वाद होत होते. पत्नी सुजाता जीन्स आणि टी शर्ट घालते याचा सुधीरला विरोध होता. त्याने या गोष्टीवरुन तिला बऱ्याचदा हटकले होते. याचा कराणावरुन सतत दोघांमध्ये वाद होत होते. तसेच पत्नीच्या फेसबुकवर तिच्या मित्रांसोबतचे चाटिंग करण्यावरुनही दोघांमध्ये वाद झाला होता.

दरम्यान, नवरा-बायकोच्या भाडणांनतर शेजाऱ्यांनी बेशुद्ध पडलेल्या सुजाताला रुग्णालयात दाखल केले. सुजाताची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI