Hyundai Creta | Hyundai च्या नवीन क्रेटाची क्रेझ, लॉकडाऊनमध्ये 55000 पेक्षा जास्त बुकिंग

Hyundai Creta च्या डीझेल मॉडेलला अधिक मागणी आहे. एकूण बुकिंगपैकी 60 टक्के बुकिंग ही डीझेल मॉडेलची झाली आहे.

Hyundai Creta | Hyundai च्या नवीन क्रेटाची क्रेझ, लॉकडाऊनमध्ये 55000 पेक्षा जास्त बुकिंग

मुंबई : Hyundai ची नवीन क्रेटा 16 मार्च 2020 ला लॉन्च झाली. त्याच्या एका आठवड्यात कोरोनाच्या (Hyundai Creta Bookings Cross 55000) संकटामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून ते आतापर्यंत क्रेटाची बुकिंग दिवसेंदिवस वाढत चालली. लॉकडाऊनदरम्यानही क्रेटाला ग्राहकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे (Hyundai Creta Bookings Cross 55000).

कोरोनाच्या काळातही नवीन क्रेटाचे दिवाने स्वत:ला थांबवू शकले नाहीत. आतापर्यंत 55 हजार पेक्षा जास्त युनिटची बुकिंग झाली आहे, अशी माहिती Hyundai मोटार इंडियाने दिली.

Hyundai Creta च्या डिझेल मॉडेलला अधिक मागणी आहे. एकूण बुकिंगपैकी 60 टक्के बुकिंग ही डिझेल मॉडेलची झाली आहे. कंपनीनुसार जवळपास 30 टक्के ग्राहकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ‘क्लिक टू बाय’च्या माध्यमातून कंपनीशी संपर्क केला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

बेस्ट सेलिंग कारमध्ये क्रेटा टॉपवर

लॉकडाऊनमुळे देशात जवळपास 50 दिवसांपर्यंत सर्व शोरुम बंद होते, यादरम्यान क्रेटाला हे यश मिळालं आहे. इतकंच नाही तर मे आणि जून महिन्यात क्रेटा बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती.

अनेक दशकांनंतर पहिल्यांदा असं घडलं की सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मारुती सुजुकीची गाडी नव्हती. मे महिन्यात Hyundai क्रेटाच्या 3,212 गाड्या विकल्या गेल्या आहेत.

नवीन क्रेटाचा लूक बदलला

नवीन क्रेटाच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय क्रेटाचे अनेक फीचर्सही अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना क्रेटा पहिल्याच नजरेत पसंत पडत आहे. नवीन क्रेटा एसयुव्ही 5 इंजिन-गिअरबॉक्स कॉम्बिनेशन आणि 5 व्हेरिअंट लेव्हलमध्ये उपलब्ध आहे (Hyundai Creta Bookings Cross 55000).

क्रेटाची किंमत किती?

क्रेटाच्या बेस मॉडलची एक्स शोरुम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 17.20 लाख रुपये आहे. नवीन क्रेटाच्या डिझेल इंजिनमध्ये 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटेमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.

नवीन क्रेटाचे पाच व्हेरिअंट

नवीन Hyundai Creta ही BSVI पेट्रोल आणि BSVI डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल, 1.4 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. Hyundai Creta 2020 पाच व्हिरिअंट E, EX, S, SX आणि SX(O)मध्ये उपबल्ध आहेत. नवीन क्रेटामध्ये किआ सेल्टोसमध्ये लावण्यात आलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने बघायचं झालं तर Hyundai Creta मध्ये ड्युअल एअरबेस, EBD सह ABS, रिअर पार्किंग सेन्सर्स, ड्राईव्हर आणि पॅसेंजर सीटबेल्ट रिमाईंडर, एमर्जेन्सी स्टॉप सिग्नलसारखे फीचर्स आहेत. त्याशिवाय कारच्या हायर व्हेरिअंटमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलीटी कंट्रोल, व्हेईकल स्टेबिलीटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, रिअर डिस्क ब्रेक्स, स्टेअरिंग एडेप्टिव्ह पार्किंग गाईडलाईन्ससोबत रिअर कॅमेरा, ISOFIX आणि बर्गलर अलार्मही आहे.

भारतीय बाजारात क्रेटाची स्पर्धा kia seltos, एमजी हेक्टर, महिंद्रा एक्सयूव्ही 500 आणि टाटा हॅरिअर सारख्या एसयुव्हीसोबत आहे. त्याशिवाय, Hyundai नवीन क्रेटा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे.

Hyundai Creta Bookings Cross 55000

संबंधित बातम्या :

कार-बाईक घेण्यासाठी ‘या’ दिवसापर्यंत थांबा, IRDA चे नियम बदलल्याने वाहनांची किंमत कमी होणार

मारुती सुझुकीकडून ‘Buy Now Pay Later’ ऑफर लाँच, आता कार घ्या, दोन महिन्यांनी EMI सुुरु

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI