कोरोनाची धास्ती, कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

| Updated on: Mar 14, 2020 | 7:57 AM

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाची धास्ती, कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
Follow us on

कोल्हापूर : जगभरात हाहा:कार माजवलेल्या कोरोना (Disaster Management Act Kolhapur) विषाणूची आता भारतासह महाराष्ट्रतही दहशत वाढत आहे. राज्यात दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या राज्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Disaster Management Act Kolhapur) जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.

यानुसार, कोल्हापुरातील सर्व सार्वजनिक (Disaster Management Act Kolhapur) कार्यक्रम, जत्रा, उरुस यांवर 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासनाकडून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 वर

राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Virus In Pune) आहे. अमेरिकेहून पुण्यात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर मुंबई आणि अहमदनगरमधील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 4 झाली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

शाळा, कॉलेज, जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा बंद ठेवणार : मुख्यमंत्री 

कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक (Disaster Management Act Kolhapur) उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.

यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (Corona Virus In Pune) सांगितले.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण

  • पुणे – 10
  • नागपूर – 3
  • मुंबई – 4
  • ठाणे – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  1. पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  2. दाम्पत्याची मुलगी – 10 मार्च
  3. नातेवाईक – 10 मार्च
  4. टॅक्सी चालक – 10 मार्च
  5. मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  6. नागपुरात 1 – 12 मार्च
  7. पुण्यात आणखी एक – 12 मार्च
  8. पुण्यात 3 – 12 मार्च
  9. ठाण्यात एक – 12 मार्च
  10. मुंबईत एक – 12 मार्च
  11. नागपुरात 2 – 13 मार्च
  12. पुण्यात 1 – 13 मार्च
  13. अहमदनगर 1 – 13 मार्च
  14. मुंबईत एक – 13 मार्च

Disaster Management Act Kolhapur

संबंधित बातम्या :

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक