AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

17 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये (America) 24 तासांमध्ये 63,044 नवी प्रकरणं समोर आली आहे. हा आकडा जगातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे.

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली
| Edited By: | Updated on: Oct 18, 2020 | 7:18 AM
Share

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा (Coronavirus) धोका थांबवण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे पण तरीदेखील मोठ्या संख्येनं रुग्ण वाढताना दिसले. पण आता मात्र भारतीयांसाठी (India) मोठी आनंदाची बातमी (Good News) समोर येत आहे. गेल्या अडीच महिन्यात (74 दिवस) जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण समोर येण्याचा रेकॉर्ड अखेर थांबला आहे. 17 ऑक्टोबरपासून याला ब्रेक लागला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (india coronavirus good news after 2 and a half months highest corona cases chain has broken)

जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये (America) 24 तासांमध्ये 63,044 नवी प्रकरणं समोर आली आहे. हा आकडा जगातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. 4 ऑगस्टपासून संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक नवीन कोरोना प्रकरणं भारतातून समोर येत होती. 17 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 62,212 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. भारत कोरोनाच्या संक्रमणात जगातील दुसरा देश आहे. अमेरिकेत आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण प्रकरणांची संख्या 78,96,895 इतकी आहे.

खरंतर, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये भारत दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. भारतात आतापर्यंत कोारोनाची 74,32,680 प्रकरणं समोर आली आहे. अमेरिकेत मागच्या 24 तासामध्ये 874 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, या आकडा जगातील सगळ्यात मोठा आकडा आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 2,16,073 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला तर भारतात कोरोनामुळे एकूण 1,12,998 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असले तरी दिलासादायक बाब (Corona Recovery Rate Increases) म्हणजे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचंही प्रमाणही वाढलं आहे. सध्या राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट हा 86 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत साडे तेरा लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत (Corona Recovery Rate Increases).

राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज दिवसभरात 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली आहे. तर, राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 1 लाख 85 हजार 270 एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

इतर बातम्या-

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी

(india coronavirus good news after 2 and a half months highest corona cases chain has broken)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.