ट्रम्प खोटे बोलले, काश्मीरबाबत मध्यस्थीचं निमंत्रण दिलं नाही : भारत

इम्रान खान यांनी ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नावर लक्ष द्या, असं गाऱ्हाणं घातलं. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार असल्याचं सांगितलं. तसेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.

ट्रम्प खोटे बोलले, काश्मीरबाबत मध्यस्थीचं निमंत्रण दिलं नाही : भारत
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 9:30 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान इम्रान खान यांनी काल (23 जुलै) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली. यावेळी इम्रान खान यांनी ट्रम्प यांना काश्मीर प्रश्नावर लक्ष द्या, असं गाऱ्हाणं घातलं. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार असल्याचं सांगितलं. तसेच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.

काश्मीर प्रश्नावर भारताने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कुठल्याही प्रकारची मदत मागितली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्ट केलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे अशाप्रकारची कुठलीही विनंती केली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

हेही वाचा : अमेरिकेत इम्रानच्या अब्रूचं खोबरं, स्वागताला कुणीच नाही, मेट्रोने जावं लागलं!

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करायला तयार आहेत, असं सांगण्यात आलं. मात्र, अशी कुठलीही विनंती पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेली नाही. काश्मीर प्रश्नावर भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे”, असं ट्विट रवीश कुमार यांनी केलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा ठरला आहे.

ट्रम्प यांच्या या दाव्यावर अमेरिकेच्या डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार ब्रॅड शेरमॅन यांनीही टीका केली. सर्वांना माहित आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारची कुठलीही विनंती करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य चुकीचं आणि लाजीरवाणं आहे, असं ब्रॅड शेरमॅन म्हणाले.

‘काश्मीर मुद्यावर भारताने नेहमीच तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा विरोध केला आहे. दक्षिण आशियाच्या परराष्ट्र नीतिबाबत ज्याला कुणालाही थोडीफार माहित आहे, त्याला हे माहित आहे. पंतप्रधान मोदी हे कधीही अशी कुठली विनंती करणार नाहीत. ट्रम्प यांचं हे वक्तव्य निराशाजनक आहे’, असंही ब्रॅड शेरमॅन यांनी सांगितलं. तसेच, ‘मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निराशाजनक चुकीबाबत भारतीय राजदूत हर्ष वी. श्रृंगला यांची माफी मागितली आहे’, असं ट्विट ब्रॅड शेरमॅन यांनी केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना काय सांगितलं?

या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करावी अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. त्यावर ‘दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि माझी भेट झाली. त्यावेळी आम्ही काश्मीर मुद्यावर चर्चा केली. त्यांनी मला मध्यस्थी करण्यासाठी विचारलं. मी म्हणालो कशाबाबत मध्यस्थी. तर त्यांनी सांगितलं की, काश्मीर मुद्यावर. अनेक वर्षांपासून हा विवाद सुरु आहे. ते आता या मुद्याचं निराकरण करु इच्छित आहेत. त्यावर मी म्हटलं, मला मध्यस्थी करुन आनंद होईल’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्यासमोर केलं.

अमेरिकेत इम्रान खान यांचा अपमान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. इथे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्दिपक्षीय चर्चा केली. यासाठी शनिवारी (20 जुलै) इम्रान खान हे कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेतील वॉशिंग्टनला पोहोचले. मात्र, या दरम्यान त्यांना मोठा अपमान सहन करावा लागला. इम्रान खान अमेरिकेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचा कुठलाही नेता किंवा अधिकारी पोहोचला नाही. इतकंच नाही, तर तिथे कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. विमानतळावर इम्रान खान यांच्यासाठी कुठल्याही वाहनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे इम्रान खान आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर लोकांना मेट्रोने त्यांच्या निवासस्थानापर्यंत (पाकिस्तान हाऊस) जावं लागलं होतं.

VIDEO :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.