Chandra Grahan 2020 | वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

Chandra Grahan 2020 | वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?
फोटो सौजन्य : गुगल

छायाकल्प (पीनम्ब्रल- penumbral lunar eclipse) चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही.

अनिश बेंद्रे

|

Jun 05, 2020 | 1:23 PM

मुंबई : या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आज (शुक्रवार 5 जून 2020 रोजी) भारतातून दिसणार आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्राचा रंग तांबूस (लालसर) दिसेल. रात्री 11 वाजून 16 मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात होईल, तर उद्या (शनिवार सहा जून रोजी) पहाटे दोन वाजून 32 मिनिटांनी ग्रहण सुटेल. भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप खंडात हे ग्रहण पाहण्याचा योग आहे. (Penumbra lunar eclipse)

ग्रहणाचा कालावधी 3 तास 15 मिनिटांचा आहे. रात्री 12 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण पूर्ण प्रभावी होईल. आजचे ग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे. ग्रहण कालावधीत चंद्र काहीसा धूरकट दिसेल. मात्र चंद्रग्रहण तितकं सुस्पष्ट दिसणार नाही, फक्त चंद्रावर हलकीशी सावली पडल्याचं दिसेल, असं तज्ज्ञ मानतात.

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय?

जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत. या स्थितीला चंद्रग्रहण म्हटले जाते.

चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो, तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण घडते. पण छायाकल्प (पीनम्ब्रल- penumbral lunar eclipse) चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो. त्यामुळे चंद्रावर गडद सावली दिसत नाही. छायाकल्प चंद्रग्रहण पूर्ण ग्रहणासारखे नसते.

जून महिन्यातील पौर्णिमेला ‘स्ट्रॉबेरी मून’ही म्हटले जाते. म्हणूनच आजच्या ग्रहणाला ‘स्ट्रॉबेरी चंद्रग्रहणा’चे नाव दिले गेले आहे. याला ‘रोज मून’ (गुलाब) किंवा हनीमूनही संबोधले जाते.

जून आणि जुलै दरम्यान दोनवेळा ग्रहण लागणे सर्वसाधारण आहे, पण क्वचितच घडणारा तीन ग्रहणांचा योग यावेळी घडणार आहे. यामध्ये दोन चंद्रग्रहणं, तर एका सूर्यग्रहणाचा समावेश आहे.

2020 या वर्षात एकूण 4 चंद्रग्रहणे होणार आहेत. त्यापैकी पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारीला झालं. तर उरलेली चंद्रग्रहणं आज (5 जून), 5 जुलै आणि 30 नोव्हेंबर रोजी होतील. 21 जूनला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतासह आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील काही देशांतून दिसेल. (Penumbra lunar eclipse)

(Penumbra lunar eclipse)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें