नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले. न्यायालयाने पाकिस्तान सरकारला कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्यास सांगितले. तसेच कुलभूषण यांना संपूर्ण कायदेशीर मदत देण्याचेही निर्देश दिले. यात भारताचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची मोठी भूमिका होती. या निकालानंतर राजकीय नेत्यांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वच स्तरातून साळवे यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर कुलभूषण यांच्याबाजूने लढणारे भारतीय वकील साळवे आणि पाकिस्तानकडून लढणारे वकील खावर कुरैशी यांची मानधनावरुन तुलनाही होत आहे.