AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनची नाराजी

खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे (Indian Medical Association on Sanjay Raut).

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनची नाराजी
| Edited By: | Updated on: Aug 18, 2020 | 3:33 PM
Share

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे (Indian Medical Association on Sanjay Raut). इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी नाराजी दर्शवली आहे. नुकतेच एका मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊडरला अधिक ज्ञान असते, असं म्हटले होते (Indian Medical Association on Sanjay Raut).

अविनाश भोंडवे म्हणाले, “खासदार संजय राऊत यांच्या विधानाने दु:ख झाले. संजय राऊत यांनी विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी. राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त डॉक्टर अहोरात्र झटत आहेत. तन-मन-धन ते अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत.”

“आतापर्यंत साधारण चार हजार डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली, तर 50 डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर रुग्ण बरे होण्यासाठी नवरात्र काम करत आहे. अशा परिस्थितीत खासदार संजय राऊत यांच्या विधानानं दुःख झालं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यम वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर ते डॉक्टरांविषयी अवमानकारक वक्तव्य केलं जातं”, असंही भोंडवे म्हणाले.

“काही डॉक्टरांच्या चुकीच्या कामामुळे सर्वच डॉक्टरांवर बोट केलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचं मनोधैर्य वाढवणे अपेक्षित असताना त्यांचं मनोबल कमी होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे”, असंही भोंडवेंनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

“कंपाऊडरला डॉक्टरांपेक्षा अधिक ज्ञान असते. त्यामुळे मी नेहमी डॉक्टरपेक्षा कंपाऊडरकडून गोळ्या घेणे पंसत करतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांच्या संघटनेंकडून विरोध केला जात आहे. तर काहीं डॉक्टरांनी यावर नाराजी दर्शवली आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही काही डॉक्टरांच्या संघटनेकडून केली जात आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे.”

“भारतातील डॉक्टर एवढे अचाट आणि अफाट आहेत की त्यांनी आपला कंपाऊंडरसुद्धा तेवढा ताकदीचा निर्माण केलाय, जो डॉक्टरकीचं काम करु शकतो. खरंतर हा डॉक्टरांचा बहुमान आहे. डॉक्टरांनी आपले सहाय्यक, सहकारी यांना अत्यावश्यक समयी आपल्या बरोबरीने या कार्यासाठी उभं केलं. हे जगात कुठेच नाही, हे फक्त भारतात आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.

“माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकाऱ्यांविषयी आदर राहिला आहे. कंपाऊडर हा प्रकार टाकाऊ नाही. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या विचाराशी संबंधित संघटनेने इतकं टोकाची भूमिका घ्यायची जरुरी नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या :

मी डॉक्टरांचा अपमान केला नाही, कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये : संजय राऊत

संजय राऊतजी, एकवेळ डॉक्टरांची माफी मागू नका, पण जनतेची मागा, ‘कंपाऊंडर’ वादावर ‘मार्ड’चे डॉक्टर आक्रमक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.